सांगोला : लग्नानंतर चार-पाच दिवसांनी लगेचच विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन घर घेण्यासाठी आई-वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत विद्या श्रेयांश सूर्यवंशी (रा. परीट गल्ली, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.