
वैराग : यावली (ता. बार्शी) येथे सोनाई दूध डेअरी व सालगुडे आईस्क्रीम युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दूध शीतकरण मशिन, कुल्फी बनवण्याचे मशिन, दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे मशिन, शीतगृह तसेच पशुखाद्य व इतर मशिनरी आणि शेड जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचे उद्योजकाचे म्हणणे आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.