श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर

श्रावण विशेष : श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर
श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर
श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरCanva
Summary

जेऊर (ता. अक्कलकोट) येथील श्री काशीविश्‍वेश्‍वर देवस्थानास दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते.

अक्कलकोट (सोलापूर) : जेऊर (ता. अक्कलकोट) (Jeur, Taluka Akkalkot, Solapur) येथील श्री काशीविश्‍वेश्‍वर देवस्थानास (Kashi Vishweshwar Temple) दक्षिण काशी (Dakshin Kashi) म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी असणाऱ्या अखंड पाण्याच्या वलयात असणाऱ्या स्वयंभू लिंगाचे अनन्य साधारण धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटक (Karnataka) सीमेवर सुमारे चारशे वर्षांपूर्वीपासून असलेले श्री काशीविशेश्वराचे हे जुने हेमाडपंती मंदिर आहे. या ठिकाणी झालेले बांधकाम व इतर आकर्षक कलाकुसर ही उत्कृष्ट प्राचीन वास्तुशिल्पाचा नमुना म्हणून गणली जाते.

श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर
श्रावण विशेष : सीना-कान्होळा नदीच्या संगमावरील आदिनाथ मंदिर

या ठिकाणी असलेले शिवलिंग हे एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास असलेल्या अखंड पाण्याच्या वलयात स्थित आहे. या लिंगाभोवती असलेल्या जलास भाविक श्रद्धेने गंगाजल म्हणून सेवन करत असतात. अशा प्रकारचे वर्षातील तिन्ही ऋतू, प्रचंड कोरड्या किंवा ओल्या दुष्काळात सुद्धा थेंबभरही कमी न होणारी लिंगाभोवतीची पाण्याची पातळी असल्याने वर्षभरात सतत हजारो भाविक दर्शनासाठी जेऊर येथे येत असतात. या ठिकाणी भरणारा दरवर्षी पांडवपंचमीचा लाखभर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणारा रथोत्सव सोहळा अथवा श्रावण मासात दर सोमवारी आणि अमावस्या तसेच वर्षभर सण- उत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक दर्भनास श्रद्धेने येत असतात. श्रावण मासात मोठा सद्‌गुरू पांडुरंग महाराज यांचा महिनाभर प्रवचन सोहळा तर शेवटी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. मागील वर्षीचा कोरोना काळ हा या सर्व सोहळ्यांना अपवाद ठरला आहे.

श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरातील साठ फूट खोल विहिरीचे पाणी आटते पण जमिनीस समतल लिंगाचे पाणी मात्र निरंतर आहे तेवढेच राहते, म्हणून यास दक्षिण काशी म्हणतात आणि ही घटना विस्मयकारक आहे. हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.

- रेवणसिद्ध बुद्याळ, भाविक, मुलुंड, मुंबई

श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर
'सैराट'मुळे प्रसिद्ध झालेल्या 'या' स्थळांना आजही पर्यटक देताहेत भेटी !

श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरातील आणखी महत्त्वाच्या धार्मिक बाबी

  • मंदिरातील साठ फूट खोलीची हेमाडपंती बांधकाम असलेली विहीर

  • गर्भगृह व आवारात आकर्षक नक्षीकाम असलेले खांब व छतावर कोरीव काम

  • विहिरीत असलेली जोड शिवलिंग मूर्ती

  • मंदिरात स्वयंभू लिंगाभोवती शंख, शिंपले, वाळू आणि पाणी सुद्धा कधीकधी गाभाऱ्यातून वर येते

  • मंदिरात असलेली शेषणानारायण मूर्ती

जेऊर परिसरात आल्यानंतर भेट देण्यासारखे अन्य महत्त्वाचे धार्मिक व नैसर्गिक ठिकाण

  • अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर

  • गौडगाव येथील जागृत मारुती मंदिर

  • हैद्रा येथील ख्वाजा सैफुल मुलूक दर्गाह

  • कुरनूर येथील निसर्गरम्य धरण

  • पक्षी अधिवास असलेले गळोरगी येथील तलाव क्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com