गजानन महाराज पालखीचे माचणूर येथे स्वागत...

श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५३ वे वर्ष
Shri Sant Gajanan Maharaj Palkhi at Machnur 53rd year of Wari solapur
Shri Sant Gajanan Maharaj Palkhi at Machnur 53rd year of Wari solapur sakal

मंगळवेढा(सोलापूर) : 'गण गण गणात बोते 'व टाळ मृदंगाच्या गजरात आज बुधवार ( ता.6) रोजी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये 'श्री 'चा मुखवटा विराजमान होताच श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे माचनूर नगरीत आगमन झाले. मंगळवेढा तालुक्याच्या हद्दीत पालखीचे आगमन होताच तहसिलदार स्वप्निल रावडे, तहसिलदार अभिजित पाटील,गटविकास अधिकारी शिवाजी पाटील ,डॉ नंदकुमार शिंदे,सह.पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सहा.पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे,सरपंच पल्लवी डोके,उमेश डोके,ग्रामसेवक गोरख जगताप आदीने पालखीचे स्वागत केले .श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५३ वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली.

मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून पायी वारीमध्ये खंड पडला होता. शेगाव येथील मंदिरातून 6 जून रोजी प्रस्थान झालेली ही दिंडीचा प्रवास 33 दिवसात 750 किमी चालत वाटेत लागणाऱ्या नऊ जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी ,वाहन,घोडे , बँड पथक आदी वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते माचणूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत आज जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीचे सिद्धेश्वर मंदिर परिसरात प्रवेश करताच भक्तिमय वातावरणात हा परिसर हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेला होता. मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांसाठी नाश्त्याची व जेवणाची व्यवस्था माचनूर येथील सुनील नांदे यांच्याकडून करण्यात आली होती .बुधवारी (ता.6) रोजी पालखीचा मुक्काम असून गुरुवारी( ता.7) रोजी सकाळी पालखी मंगळवेढ्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ब्रह्मपुरी येथे सकाळी राजेंद्र पाटील व संजय पाटील यांच्याकडून अल्पोपाहर व चहा पान ची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्धी असलेल्या शेगाव येथील गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविक हरिनामाचा गजर करीत निघाले असून पालखी स्वागत करीत असताना भक्त भाराहून जात होते . या परिसरातील बेगमपूर ,माचणूर, अर्धनारी , रहाटेवाडी , व बठाण येथील भक्तांनी पालखी मार्गावर दर्शन घेतले. पालखी सोहळा गुरूवार (ता.7)रोजी मंगळवेढा येथील नगरपालिका शाळेच्या मैदानावर मुक्कामी असणार आहे. शुक्रवार (ता.8) रोजी पालखी सोहळा सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

ब्रह्मपुरी : माचणूर ता. मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे माचनूर येथे स्वागत करताना तहसिलदार स्वप्निल रावडे, तहसिलदार अभिजित पाटील,गटविकास अधिकारी शिवाजी पाटील , सरपंच पल्लवी डोके,सह.पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे,डॉ नंदकुमार शिंदे, आदी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com