Pandharpur News : श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जूनपासून होणार सुरू

मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; भक्तांची प्रतीक्षा संपणार
shri vitthal rukmini darshan starts from june pandharpur
shri vitthal rukmini darshan starts from june pandharpurSakal

पंढरपूर : विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची विठ्ठलभक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे.

महिनाअखेर काम पूर्ण होईल. जूनपासून विठुरायाचे पदस्पर्श सुरू होईल, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज सकाळशी बोलताना दिली. पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मुळरूप देण्यासाठी राज्य शासनाने जवळपास ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे.

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून विठ्ठल मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मंदिराचे काम सुरू असल्याने भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. पहाटे सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू आहे.

मागील दोन महिन्यांपासून मंदिर संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. आणि कामाचा दर्जा देखील तितकाच चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिर समितीने संबंधित ठेकेदाराला काम करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली होती.

ती संपली असली तरी मंदिरातील सर्व कामे अत्यंत काळजीपूर्वक आणि तितक्याच जबाबदारीने करण्यात येत आहेत. काही दिवसांचा अधिक अवधी लागला असला तरी सध्या मंदिरातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, अशा पद्धतीने संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.

दर दिवशी मंदिरातील कामाचा मंदिर समितीकडून आढावा घेतला जातो. मध्यंतरी काम संथगतीने सुरू होते. पण सध्या कामाचा वेग वाढला असून सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर खुले केले जाईल. त्या दृष्टीने काम करण्याचे आदेश दिल्याचे ही औसेकर महाराज यांनी सांगितले.

मंदिराचे काम पूर्णत्वाकडे

मंदिर संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने आवश्यक तो निधी दिली आहे. त्यामुळे मंदिराचे काम वेगाने सुरू असून ते पूर्णत्वाकडे आले आहे. महिना अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे.

त्या दृष्टीने आतापासूनच तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकाऱ्याने मंदिराच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यामुळेच भव्यदिव्य, देखणे व सुंदर असे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी लवकरच खुले होणार आहे, अशी माहितीही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com