siddheshwar temple solapur historical cultural significance  lord vishnu
siddheshwar temple solapur historical cultural significance lord vishnuSakal

Siddheshwar Temple Solapur : एकात्मिक धार्मिक स्थळ श्री सिद्धरामेश्वर मंदिर

अमृतसर मंदिराचा प्रत्यय; कळसावर श्री विष्णूच्या दशावतारांसह अन्य प्रतिमा

सोलापूर : महाराष्ट्राच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक प्रदेशाच्या सीमेवर असलेले सोलापूर आणि येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिर हे म्हणजे जणू शैव आणि वैष्णवांचे एकात्मिक धार्मिक स्थळ म्हणता येईल.

दिसायला अमृतसरच्या गोल्डन टेंपलप्रमाणे असणारे हे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे समाधीस्थान असले तरी मंदिर शैलीचा अभ्यास केला तर बहुतांश वैष्णव प्रतिमांची रेलचेल आहे. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात जास्त प्राचीन मंदिरे आहेत.

त्यातील अप्रतिम मंदिरे म्हणजे हंपी येथील विठ्ठल मंदिर होय. अशाच बांधणी व कोरीव कामातील एक उत्कृष्ट नमुना म्हणजे आपले श्री सिद्धरामेश्वर मंदिर होय. इतके प्राचिनत्व नसले तरी मंदिर निर्माणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

जरी दिसायला प्रथम दर्शनी हे शैव मंदिर असले तरी हे मंदिर शैव आणि वैष्णव पंथीयांचे मनोमिलन करणारे एक धार्मिक स्थळ आहे. कारण मंदिरात शिवलिंग व शैव पंथाशी निगडित शिल्पे असली तरी मंदिराच्या शिखरावर वैष्णव पंथाची तसेच विष्णूच्या विविध अवतारांची अनेक शिल्पे आहेत.

श्री सिद्धरामेश्वर हे बाराव्या शतकातील एक महान शिवयोगी, त्यांच्या अवतार कार्याच्या जवळपास तीनशे वर्षानंतर या मंदिराची निर्मिती करण्यात आली. परंतु ,१६ व्या शतकात या मंदिराच्या विकास झाला. पेशवाईमध्ये या मंदिराच्या अन्य भागाची निर्मिती झाली.

केवळ सिद्धरामेश्वर मंदिर नाही तर सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेल्या जागी श्री शिवयोग समाधी, यासह अनेक छोट्या छोट्या मंदिराची निर्मितीही या ठिकाणी करण्यात आली.

असा आहे परिसर

हा मंदिर आणि तलाव असा एकूण जवळपास ३७ एकराचा हा परिसर आहे. मुख्य मंदिराची उंची साधारण ५० फूट आहे. मंदिराच्या चोहोबाजूने जवळपास ५६ कळस आहेत. सभा मंडप, अंतराळ, मुख मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.

मंदिराचे क्षेत्रफळ साधारण साडेपाच एकर आहे. त्याच्या भोवतीचे पाणलोट क्षेत्र साधारण १९ एकर आहे. पशुपक्षी, शिल्प, द्वारपाल, सप्तमातृका अशी विविध प्रकारची शिल्पे या ठिकाणी आढळून येतात.

मंदिरात प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार मुख्य असून तलावातून मंदिरात येण्यासाठी दगडी बांधकामातील पूल आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी काळ्या बेसॉल्ट स्वरुपातील दगड वापरण्यात आले आहेत. शिखर हे चुना आणि वीट कामातून केलेले आहे. यावरुन याचे प्राचिनत्व समजते.

- संजीवकुमार व्यास, दाधिच समाजातील ज्येष्ठ नागरिक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com