'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट! Educational | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!
'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!

'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!

सोलापूर : डब्ल्यूआयटी (Walchand Institute of Technology) महाविद्यालयातील अंतिम वर्षातील 485 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या (Placement) माध्यमातून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशभरात नोकरीची (Jobs) संधी मिळाली आहे. नैतिक दोशी या विद्यार्थ्याला ऍमॅझॉन डेव्हलपमेंट सेंटरमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वार्षिक 15 लाखांचे पॅकेज मिळाले. टलास कॉपको या बहुराष्ट्रीय कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या पाच विद्यार्थ्यांची प्रिमियम जॉब प्रोफाईलसाठी सहा लाख 40 हजारांच्या पॅकेजसाठी निवड केली. अनेक कंपन्यांमध्ये उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनाही स्टायपेंडसह अन्य सुविधा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: DRDO मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी होतेय भरती!

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना इन्फोसिस, टी. सी. एस., पर्सिस्टंट, अँक्‍सेंचर, विप्रो, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, झोरीयंट, टेक महिंद्रा, अटॉस ग्लोबल आय. टी. सोल्यूशन प्रा. लि., टलास, कॉपको, माईंडट्री, सेलेबल टेक्‍नोलॉजी, अँग्लो ऍण्ड ईस्टर्न, एक्‍सेस.आयओ, सॅंकी, बिजनेस सोल्यूशन प्रा. लि., बायजू, केएसबी पंप्स लि., त्रिवेणी टर्बाईन्स लि., फेस प्रेप, फॉरेसिया, मॅकेलिन इंडिया टेक्‍नॉलॉजी सेंटर प्रा. लि. या नामांकित कंपन्यांनी प्लेसमेंट देऊन डब्ल्यूआयटीच्या अभियांत्रिकी शिक्षण प्रणालीवर मोठा विश्‍वास दाखवला. ऑगस्ट 2022 मध्ये पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांनाही प्लेसमेंट मिळाले.

संस्थेचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्‍वस्त भूषण शहा, पराग शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट अधिकारी डॉ. एस. एन. कुलकर्णी, प्रा. प्रसन्न एखंडे, प्रा. शशिकांत गोसावी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकांचेही त्यासाठी योगदान लाभले.

विद्यार्थ्यांचे यश हेच 'वालचंद'च्या यशाचे गमक

वालचंद शिक्षण समूहाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक प्रायोगशाळा व यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. 'शिक्षण हाच धर्म' या ब्रीदानुसार प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून मोलाची कामगिरी केली. साधन सामुग्रीला जोडून समृद्ध शैक्षणिक वातावरणामुळे महाविद्यालयास स्वायत्त (Autonomous) दर्जा मिळाला. वालचंद शिक्षण समूहासाठी तो मैलाचा दगड ठरत आहे, असे मत डॉ. रणजित गांधी यांनी व्यक्‍त केले.

हेही वाचा: पीएचडीच्या मौखिक परीक्षा दुसऱ्यांदा पुढे ढकलल्या!

वालचंद शिक्षण समूहातील गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे 'डब्ल्यूआयटी'ला ऑटोनोमसचा (स्वायत्तता) दर्जा मिळाला. अभियांत्रिकीच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून विद्यार्थ्यांसाठी विविध शाखानिहाय नियमित बी. टेक पदवी बरोबरच उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सोय ऑनर्स डिग्रीतून उपलब्ध करून दिली आहे.

- डॉ. शशिकांत हलकुडे, प्राचार्य, डब्ल्यूआयटी, सोलापूर

loading image
go to top