मंगळवेढ्यात एकाच दिवसात 81 जणावर कारवाई करत 40 हजार दंड वसूल .

mask karwai.jpg
mask karwai.jpg
Updated on: 

मंगळवेढा (सोलापूर) :   पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचनेनुसार पोलिसांनी मास्क नसणाय्रावर कारवाईची मोहीम तीव्र करत एकाच दिवशी 81 जणावर कारवाई करत 40 हजार इतका एवढा दंड वसूल केला .
 कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढू लागल्यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली त्या संदर्भात नवीन काही मार्शदर्शक सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केल्या. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी देखील पोलिस प्रशासनाला कडक कारवाईच्या सूचना दिल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंगळवेढा येथील आढावा बैठकीसाठी दौर्‍यात आले . तेव्हा  पंढरपूर पेक्षा मंगळवेढ्यात मास्क नसणाय्राची संख्या अधिक आढळून आली. नागरिकांमध्ये  कोरोना विषयी  काळजी नसल्याचे दिसून आल्यामुळे भविष्यात संसर्ग वाढू नये म्हणून तातडीने कडक कारवाई करावी अशा सूचना तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना या बैठकीमध्ये दिल्या होत्या.

मास्क नसणाय्रावर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला भीत नसल्यामुळे पालिका कर्मचारी बरोबर पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी केली.
 त्यानंतर नव्याने पदभार घेतलेल्या उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांनी नुकसान पदभार घेतल्यानंतर त्यांनीही चुकीचे काम करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते त्यानुसार काल रात्री ही कारवाईची मोहीम दामाजी चौकात उघडण्यात आली त्यामध्ये मास्क नसणारे अनेक जण कारवाईच्या मोहिमेत अडकले. त्यामुळे कारवाईची मोहीम राबवताना पुरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. मस्का नसणारा वर केलेल्या कारवाईतील जमा रकमेतून गोरगरीब व आर्थिक कुवत नसलेल्या साठी कोरोना प्रतिबंधक साहित्य खरेदीसाठी ती रक्कम उपलब्ध करावी अशी मागणी ज्ञानेश्वर कौडूभैरी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे यापूर्वीच केली.

कारवाईत सातत्य ठेवले जाणार
कारवाई एका दिवसापुरती मर्यादित नसून कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सहकार्य करून कोरोना पासून स्वतःचा कुटुंबाचा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्स चे पालन करावे न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
- ज्योतीराम गुंजवटे पोलीस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com