esakal | किती चलाख हा चोर ! 45 मिनिटात लांबविले साडेसहा लाखांचे दागिने; गृहिणी भाजी आणायला तर पती अंघोळ करीत होते
sakal

बोलून बातमी शोधा

44thief_13_1.jpg

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार.... 
पती घरात अंघोळ करीत असताना घराचा दरवाजा पुढे करुन भाजी आणायला गेली होते. त्याचवेळी चोरट्याने घरात प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाटातून सोन्या, चांदीचे सहा लाख 60 हजार 500 रुपयांचे दागिने चोरुन नेले, अशी फिर्याद दिप्ती जय आनंद यांनी आज (मंगळवारी) विजापूर नाका पोलिसांत दिली. ही घटना सोमवारी (ता. 4) सकाळी 11.15 ते दुपारी 12 या वेळेत घडल्याचेही पोलिस फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

किती चलाख हा चोर ! 45 मिनिटात लांबविले साडेसहा लाखांचे दागिने; गृहिणी भाजी आणायला तर पती अंघोळ करीत होते

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : होटगी रोडवरील बालाजी अपार्टमेंट येथील गृहिणीने भाजी आणायला जाताना दरवाजा पुढे केला. ही संधी साधून चोरट्याने घरातील तब्बल साडेसहा लाखांचे दागिने चोरून नेले. दीप्ती जय आनंद यांनी विजापूर नाका पोलिसांत चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास गायकवाड हे करीत आहेत.  

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार.... 
पती घरात अंघोळ करीत असताना घराचा दरवाजा पुढे करुन भाजी आणायला गेली होते. त्याचवेळी चोरट्याने घरात प्रवेश केला आणि बेडरुममधील कपाटातून सोन्या, चांदीचे सहा लाख 60 हजार 500 रुपयांचे दागिने चोरुन नेले, अशी फिर्याद दिप्ती जय आनंद यांनी आज (मंगळवारी) विजापूर नाका पोलिसांत दिली. ही घटना सोमवारी (ता. 4) सकाळी 11.15 ते दुपारी 12 या वेळेत घडल्याचेही पोलिस फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

होटगी रोडवरील दीप्ती आनंद यांचे पती जय आनंद हे अंघोळीला गेले होते. त्यावेळी दीप्ती यांनी दरवाजा पुढे केला आणि भाजी आणायला घराबाहेर पडल्या. त्यावेळी चोरट्याने घरातील दागिने चोरून नेले. विशेष म्हणजे ड्रॉवरच्या चाव्या ड्रॉवरजवळच ठेवलेल्या असल्याने चोरट्याला चोरी करायला फारसा वेळ लागला नाही. सोन्याचे चार मंगळसूत्र, अंगठ्या, दोन लॉकेट, एक नेकलेस, झुबे, कर्णफुले, रिंगा, पेंडल, कडे, एक मोती, एक माणिक 60 हजार रुपये किंमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि 18 हजार रुपयांची रोकड घेऊन चोरट्याने काहीवेळातच तिथून पलायन केले. विशेषत: त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घराच्या परिसरात, अपार्टमेंटमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी बाहेरील लाईट चालू ठेवावी, दुकानदारांनी दोन्ही बाजूंनी शटरला कुलूप लावल्यानंतर मध्यभागी अलार्म लावावा, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्‍त अभय डोंगरे यांनी केले आहे. 

loading image