कुर्डुवाडीतील एटीएम फोडणारे सहा चोरटे मध्य प्रदेशातून ताब्यात ! मिळाली दोन दिवसांची पोलिस कोठडी

Six thieves who broke into an ATM in Kurduwadi have been arrested from Madhya Pradesh and brought to Kurduwadi
Six thieves who broke into an ATM in Kurduwadi have been arrested from Madhya Pradesh and brought to Kurduwadi
Updated on

कुर्डुवाडी (सोलापूर) : येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी सहा जणांना मध्य प्रदेश येथील पोलिसांकडून ताब्यात घेऊन कुर्डुवाडी येथे आणले आहे. त्यांना माढा न्यायालयात हजर केले असता कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समशेर ऊर्फ दलशेर फजरू (वय 40, रा. गंगोरा, जिल्हा भरतपूर, राजस्थान), साहाजात ऊर्फ शहादत ऊर्फ हाजर खान (वय 25, रा. पिनुगुवा, जिल्हा नूह, हरियाणा), शाकीर फजरू (वय 40, रा. गंगोरा, जिल्हा भरतपूर, राजस्थान), आसमोहम्मद फजरुद्दीन (वय 34, रा. नांगलीपठाण, जिल्हा अलवर, राजस्थान), मसी उल्लाह अख्तर (वय 21, रा रामपुरी, जिल्हा नूह, हरियाणा), मुशरीफ खान शरीफ कमरुद्दीन खान (वय 27, रा. सरस्वास, जिल्हा नूह, हरियाणा) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे आहेत. 

24 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजून पाच मिनिटे ते पहाटे पाचच्या दरम्यान येथील माढा रस्त्यालगत असलेले बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरट्यांनी 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. तसेच एटीएम मशीनचे देखील 25 हजार रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत एटीएम फायनान्शियल सिस्टीम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एरिया मॅनेजर सचिन सुखदेव चौधरी (वय 30, रा. शिरोळे, ता. बार्शी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरील सहा जणांना मध्य प्रदेशमधील परवलीया सडक पोलिस ठाण्याअंतर्गत भागात रात्री चोरी करताना तेथील पोलिसांकडून वरील सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्या वेळी तपासादरम्यान कुर्डुवाडी व इतर घडलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती उघडकीस आली. 

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन तेथील पोलिसांकडून वरील सहा जणांना ताब्यात घेतले. या पथकामध्ये पोलिस कॉन्स्टेबल दत्ता सोमवाड, विश्वजित ठोंगे, पठाण, पोलिस नाईक सागर गवळी, राहुल रिकिबे, श्री. दाढे यांनी परिश्रम घेतले.

संपादन - सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com