मेडद येथे रस्त्याने जाण्यास विरोध करून जातिवाचक शिवीगाळ ! सहाजणांविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल

Crime
Crime
Updated on

नातेपुते (सोलापूर) : मेडद (ता. माळशिरस) येथे तहसीलदारांच्या आदेशाने शेतातून काढण्यात आलेल्या सर्व्हे नंबरचा रस्ता अडवून जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव विठ्ठल तोरणे हे आपल्या कुटुंबासह मेडद येथील तोरणे वस्ती येथे राहतात. मेडद ते तिरवंडीकडे जाणाऱ्या रोडला जोडून तोरणे वस्ती ते नामदास वस्ती या ठिकाणी जाण्यासाठी जमीन गट नंबर 28, 29, 23, 24, 25, 26, 27, 38, 39, 40, 42, 43 या जमीन गटातून 12 फुटांचा सर्व्हे नंबरच्या बांधावरून रस्ता होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी महावीर विठ्ठल पाटील, संभाजी बाबा यादव, ज्ञानेश्वर संभाजी यादव, प्रकाश सुखदेव लवटे, शिवाजी सुखदेव लवटे, दादा प्रकाश लवटे (सर्व रा. मेडद, ता. माळशिरस) यांनी जमीन गट क्र. 28 व 29 मधून आम्हास जाण्या- येण्यासाठी रस्ता मोडला होता, म्हणून ज्ञानदेव तोरणे यांच्यासह दत्तू यशवंत तोरणे, महादेव रामा लवटे (सर्व रा. मेडद) या सर्वांनी वरील सहा जणांविरुद्ध सर्व्हे नंबरचा रस्ता पूर्ववत करून मिळण्यासाठी तहसीदार माळशिरस यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन 19 डिसेंबर 2019 रोजी तहसीलदार तोरणे यांच्या बाजूने निकाल देऊन रस्ता पूर्ववत करून घ्यावा, असा आदेश दिला. त्यानुसार 10 नोव्हेंबर 2020 रोजी हा रस्ता महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील, गावचे सरपंच यांच्यासह वरील सहा लोकांच्या उपस्थितीत रस्ता पोलिस बंदोस्तात तयार करण्यात आला. 

त्यानंतर 14 नोव्हेंबर 2020 रोजी वरील सहा लोकांनी जमीन गट क्र. 28 व 29 मधून तयार केलेला रस्ता ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने खणून त्यामध्ये मक्‍याचे पीक लावून त्यास पूर्ववत केलेला रस्ता मोडून टाकला. 17 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी ज्ञानदेव तोरणे यांच्यासह चुलत भाऊ दत्तात्रय यशवंत तोरणे व महादेव रामा लवटे (तिघे रा. मेडद, ता. माळशिरस) असे तिघेजण त्यांच्या घराकडे जात असताना महावीर विठ्ठल पाटील, संभाजी बाबा यादव, ज्ञानेश्वर संभाजी यादव, प्रकाश सुखदेव लवटे, शिवाजी सुखदेव लवटे, दादा प्रकाश लवटे या सहाजणांनी हा रस्ता सर्व्हे नंबरचा नाही, असे सांगून या रस्त्याने तुम्ही जायचे नाही, असे म्हणत ज्ञानदेव तोरणे व दत्तात्रय यशवंत तोरणे या दोघांना जातिवाचक शिवीगाळ केली व जर या रस्त्याने पुन्हा आल्यास तुम्हाला जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच ज्ञानदेव तोरणे, भाऊ दत्तू व महादेव रामा लवटे या तिघांच्या अंगावर वरील सहा आरोपी काठ्या घेऊन मारहाण करण्यासाठी आले. त्या वेळी भीतिपोटी फिर्यादीसह तिघेजण तेथून निघून गेले. याप्रकरणी तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com