अंतिम वर्षासाठी विद्यार्थ्यांना 'कौशल्य' कोर्स बंधनकारक !

अंतिम वर्षासाठी विद्यार्थ्यांना "कौशल्य' बंधनकारक! सोलापूर विद्यापीठाचा निर्णय
सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठCanva
Summary

अंतिम वर्षासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना 112 पैकी त्यांच्या आवडीचा कौशल्य विकासाचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सोलापूर : पारंपरिक शिक्षणातून (Traditional education) केवळ अनेकांनी पदव्या मिळविल्या आणि रोजगाराअभावी ते सुशिक्षित बेरोजगार झाले, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अंतिम वर्षासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना 112 पैकी त्यांच्या आवडीचा कौशल्य विकासाचा (Skills development) कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) संलग्नित 110 महाविद्यालयांना तसे निर्देश दिले आहेत.

सोलापूर विद्यापीठ
अखेर अकलूज नगरपरिषद, नातेपुते नगर पंचायत जाहीर !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षासाठी 25 हजार 300 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षासाठी अंदाजित 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नेहमीप्रमाणे विद्यार्थी पारंपरिक शिक्षण घेतात. पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरीसाठी अर्ज करूनही बहुतांश जणांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र आहे. एवढे शिकूनही नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य पाहायला मिळते. त्यावर उपाय म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड दिली आहे. उद्योजक निर्माण करणे आणि रोजगार मिळावा, या भूमिकेतून विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासाचा कोर्स विद्यार्थ्यांना बंधनकारक केला आहे. अंतिम वर्षाला प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा कौशल्य विकासाचा कोर्स निवडावा लागेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सोलापूर विद्यापीठ
शहरातील निर्बंध शिथिलतेचा शुक्रवारी निर्णय !

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पारंपरिक शिक्षणाला व्यावसायिकतेची जोड देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांमधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचा सहा महिन्यांचा कोर्स बंधनकारक केला आहे.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

योगा, मेडिटेशनकडे विद्यार्थ्यांचा कल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने योगा व मेडिटेशन (ध्यान) असे 25 हून अधिक नवे अभ्यासक्रम तर कौशल्य विकासाचे 112 अभ्यासक्रम सुरू केले आहेत. शारीरिक स्वास्थ्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने योगा व मेडिटेशन या कोर्सला विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. ज्या कोर्समधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या गरजा पूर्ण होतील, असा रोजगार तथा व्यवसाय सुरू करणे शक्‍य आहे, त्या कोर्सला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com