Snapchat friendship : स्नॅपचॅटद्वारे मैत्री करून प्रपोज, पैसे मागितल्यावर विनयभंग; तरुणाविरुद्ध पोक्सो, उपचारासाठी घेतले ३२ हजार
Solapur Crime : जून २०२४ मध्ये संशयिताने स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन पीडितेशी मैत्री केली. तिला शहरातील एका महाविद्यालयासमोरील कॅफेमध्ये नेले. तेथे तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगून तिला प्रपोज केला.
A young man has been arrested under POCSO charges after proposing to a woman on Snapchat and asking for money. Police are investigating the case.Sakal
सोलापूर : वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले पैसे परत मागितल्यावर तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. फेब्रुवारी महिन्यात शहरातील तानाबाना चौकात ही घटना घडली. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.