Solapur Humanity Story :'मित्राच्या मृत्यूनंतर मित्रांनी दिला आईला आधार'; सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात
WhatsApp Group Turns Lifeline: व्हाट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते एकत्र आले आणि 27 वर्षानंतरही दररोज एकमेकांचे सुख आणि दुख बरोबर कौटुंबिक, वैयक्तिक उत्सवाच्या निमित्ताने संवाद साधू लागले. त्यातच छायाचित्रकार असलेल्या श्याम डांगे या 42 वर्षीय वर्गमित्राचे नुकतेच अकाली निधन झाले.
Friends Help Late Friend’s Mom via Social Mediaesakal
मंगळवेढा : वर्गमित्राच्या निधनानंतर त्यांच्या आईला वर्गमित्र या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या आवाहनातून जमा झालेली 32 हजार रुपयाची मदत मित्रांनी मयत मित्रांच्या आईच्या हातात सोपवत तिला आधार देताना आईचे डोळे पाणवले.