युवकांनो सोशल मिडियावर वापर जरा जपूनच :अन्यथा करिअर होऊ शकते खराब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

social media using

युवकांनो सोशल मिडियावर वापर जरा जपूनच :अन्यथा करिअर होऊ शकते खराब

उपळाई बुद्रूक : सध्याच्या काळात प्रत्येकजण स्मार्ट व हुशारीपणा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. त्यात इकडे-तिकडचे मेसेज फॉरवर्ड करण्यात अनेकांचा हातखंडा आहे. त्यात धार्मिक, राजकीय, जातिय, देशविरोधी विषयांवर तर सेकंदात हे वापरकर्ते व्यक्त होतात. मात्र या मीडियाचा वापर दक्षता बाळगुन न केल्यास, व कोणत्याही पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड केल्यास चांगलेच अंगलट येऊन 'करिअर खराब' होऊ शकते व 'जेल ची हवा' लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर जरा जपूनच

सध्या राज्यात विविध जातीय, धार्मिक, हिंदू-मुस्लिम, आरक्षणांच्या मुद्यांवर भडकाऊ भाषणे करून युवकांची माथी भडकवण्यासठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष आयटीच्या छुप्या सायबर टिम कार्यरत असुन, त्यांच्याकडुन विविध जातीधर्माच्या विरोधात बदनामीकारक मेसेसे तयार करणे तसेच नेते मंडळींच्या विरोधात आक्रमक पवित्रा निर्माण होईल असे मेसेज बनवून व्हायरल केले जातात. त्यावर कोणताही विचार न करता व मेसेजची खात्री न करता त्यावर तातडीने प्रतिक्रिया देत ते शेअर करत आपण सर्वांपेक्षा किती अपडेट व हुशार आहोत हा दाखविण्याचा केविलपणा युवकांकडून केला जातो. परंतु या मीडियावर काही समाजभान नसलेले आणि विघ्नसंतोषी लोकांचाही मोठा भरणा असल्याने, ही मंडळी जहाल, तीव्र, भडक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शांतता भंग करणाऱ्या, वात्रट पोस्टच शेअर करण्यावर अधिक भर देतात. यातील एकही पोस्ट तुमच्याकडून चुकून नकळत अनावधानाने असो की भावनेच्या भरात शेअर केली जाते अन् त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

सध्या सोशल मीडियाच्या या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही. त्यातून अफवा पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात. त्यामुळे सोशल मिडियावर आलेल्या पोस्टची खात्री करूनच ते लाइक्स कमेंट्स व फॉरवर्ड करावे अन्यथा, अतिघाई संकटात नेई म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

माहिती फॉरवर्ड करताना घ्या काळजी

एखाद्या कुणाची बदनामीकारक, धार्मिक भावना दुखावणारा, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारा मेसेज जर तुम्हाला आला असेल आणि तोच मेसेच तुम्ही इतरांना पाठवल्यास तो सायबर क्राइमनुसार गुन्हा आहे. त्यामुळे पाठवणारा आणि तो मेसेज आणखी इतरांना पाठवणारासुद्धा दोषी असल्यामुळे त्याच्याविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो.

पोस्ट करताना घ्या काळजी

- सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप, ट्विटर व फेसबुकवर संवेदनशील माहिती टाकल्यास अथवा ती शेअर केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारचे धार्मिक भावना दुखावतील, तसेच वादग्रस्त पोस्ट वापरकर्त्यांनी करू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, आपण अथवा जवळचे कोणीही त्यात सहभागी होऊ नये याची खबरदारी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर योग्य ती दक्षता बाळगुनच करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मेसेज फॉरवर्ड करू नये. वादग्रस्त पोस्टकडे पोलिसांचे लक्ष असुन, अशा घटना निदर्शनास येताच कायदेशीर कारवाई केली जाईल.

सुरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक सायबर विभाग सोलापूर ग्रामीण

Web Title: Social Media Using Careful Young

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top