esakal | कोरोना : ऐक्‍याची गुढी उभारु, संकटावर एकजुटीने मात करु 
sakal

बोलून बातमी शोधा

Gudipadwa.jpg

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरवात घरोघरी गुढ्या उभारुन पारंपरिक पध्दतीने साजरी केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी पारंपरिक पध्तीने आपआल्या घरासमोर गुढी उभा करुन नववर्ष साजरा केला.

कोरोना : ऐक्‍याची गुढी उभारु, संकटावर एकजुटीने मात करु 

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे यंदाचे गुढीपाडवा सण साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक सामाजिक संदेश दिले जात आहे. कोरोना मुक्तीच्या संकल्पाने नववर्षाचे स्वागत करुया... ऐक्‍याची गुढी उभारु, आलेल्या संकटावर एकजुटीने मात करु... चला आरोग्याची गुढी उभारु मानवरुपी देवास सहकार्य करु... गुढी देशहिताची... जगावरील संकट टाळून सर्वांना निरोगी आरोग्य लाभो.. असे अनेक सामाजिक संदेश कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल मिडियावर दिले जात आहे. 
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरवात घरोघरी गुढ्या उभारुन पारंपरिक पध्दतीने साजरी केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी पारंपरिक पध्तीने आपआल्या घरासमोर गुढी उभा करुन नववर्ष साजरा केला. कोरोनाचे सावट असल्यामुळे सगळ्यांनाच यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करावे लागले. 
हिंदू नववर्षातला पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तापैंकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा सोलापूरकरांनी बुधवारी गुढी उभी करुन साजरा केला. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आज दारामध्ये गुढी उभारुन नागरिकांनी मनोभावे पूजा केली. आणि गोड पदार्थांचा आस्वाद घेतला. परंतु यंदा गुढीपाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सर्वच स्तरातून केलं जात आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्यामुळे कुठेही न फिरता गुढीपाडवा हा सण नेहमीच्या गुढीपाडव्याप्रमाणे साजरा केलेला पाहावयास मिळाला नाही. सध्याच्या गंभीर परिस्थिती पाहता वातावरणात पूर्ण बदल पाहावयास मिळाला आहे. परंतु यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा केला नसल्याचे जाणीव अनेकांना जाणवत होती. 


जत्रा रद्द 
गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी कुलदैवतांची जत्रा भरली जाती. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील सर्व जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून घराबाहेर न पडता गुढीपाडवा साजरी केली.