सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !

सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !
सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !
सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !Canva
Summary

माढा तालुक्‍यातील सोलंकरवाडी हे गाव तालुक्‍यातील पहिले व राज्यातील तिसरे अभ्यासाचे गाव होत आहे.

मोडनिंब (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील (Madha Taluka) सोलंकरवाडी (Solankarwadi) हे गाव तालुक्‍यातील पहिले व राज्यातील तिसरे अभ्यासाचे गाव (Village of study) होत आहे. या उपक्रमात गावातील मोक्‍याच्या ठिकाणची घरे, मंदिरे, शाळा, शौचालय, पाण्याची टाकी, सार्वजनिक इमारतींच्या भिंतींवर विविध विषयांची माहिती रेखाटण्यात आली असून, विद्यार्थ्यांमध्ये गावात सर्वत्र चित्रे, आकृत्या नजरेसमोर दिसल्यावर कुतूहल निर्माण होत आहे. भिंतींवरील माहिती ते आवडीने वाचन करत आहेत.

सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !
प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'पेट'चा निकाल लांबला !

या कामाची पाहणी करण्यासाठी माढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी भेट दिली. या वेळी सरपंच अनंता गलांडे, अनिल मोरे, राजाभाऊ भांगिरे, केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार, सुभाष दाढे, विक्रम भांगिरे, रविकांत शेंडगे, अशोक शेंडगे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असला तरी ग्रामीण भागात वीज आणि इंटरनेटच्या समस्यांमुळे अजूनही अनेक गावांत ऑनलाइन शिक्षण पोचू शकले नाही. मात्र, अशा स्थितीतही विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड कमी होऊ न देण्याच्या उद्देशाने सोलंकरवाडी हे गाव "अभ्यासाचे गाव' म्हणून साकारण्यात येत आहे. सोलंकरवाडी गावातील घरांच्या भिंतींवर विविध चित्रे, आकृत्या, पाढे, नकाशे, धडे, रेखाटले आहेत. यामुळे आता गावात सगळे विद्यार्थी चालता-बोलता अभ्यास करताना दिसत आहेत.

गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून, पहिली ते चौथीपर्यंत दोन वस्तीशाळा आहेत. गावातील एकूण पटसंख्या 138 असून वस्ती शाळेसह एकूण 8 शिक्षक कार्यरत आहेत. गावात इंटरनेटचा अभाव असून, विजेचाही सतत लपंडाव सुरू असतो. अनेकांकडे स्मार्ट फोनदेखील नाहीत. यामुळे ऑनलाइन शिक्षणातही अनेक अडथळे येतात. एकंदरच, अशा परिस्थितीमुळे गावातील मुलांचा अभ्यास बंद होऊ नये, या उद्देशाने केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विक्रम भांगिरे यांनी "अभ्यासाचे गाव' तयार करायची संकल्पना मांडली. त्यासाठी गावचे सरपंच अनंता गलांडे, उपसरपंच शकुंतला शेंडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन कामास सुरवात केली. या कामास डॉ. प्रदीप पाटील, धनाजी धायगुडे, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष वामन यादव, मुख्याध्यापक बाळराजे पाटील, शिक्षक शिवाजी शिंदे, परमेश्वर सुरवसे, सुषमा बारबोले, धनाजी थिटे, अर्चना मारकड, दत्तात्रय मोरे, विशाल धस यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. जगन्नाथ शिंदे, अतिष ढावरे, विकास जाधव, योगेश सोनकांबळे यांनी नाममात्र मोबदल्यात भिंती रंगवून त्यावर अभ्यासाचे धडे रेखाटण्याचे काम केले. गाव सर्व बाबतीत समृद्ध करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असून, त्यासाठी गावाला आमदार बबनराव शिंदे व पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे सहकार्य लाभत असल्याचे सरपंच अनंता गलांडे यांनी सांगितले.

सोलंकरवाडी होतेय राज्यातील तिसरे 'अभ्यासाचे गाव' !
जगण्यासाठी 'प्लॅन ए' अन्‌ छंदासाठी 'प्लॅन बी'!

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रेरणेतूनच सोलंकरवाडी सारख्या लहान गावात अभ्यासाचे गाव ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील हे तिसरे अभ्यासाचे गाव ठरत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कुर्डुवाडी

सोलंकरवाडी हे गाव नेहमी विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असून, या अगोदर जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त शाळा करण्यात आली. त्याचबरोबर निर्मल ग्राम, पर्यावरण संतुलित गाव, पाणी फाउंडेशन यासह अनेक उपक्रम राबविले असून, या गावाला नेहमी सहकार्य राहील.

- साधना पाटील, सदस्या, पंचायत समिती, कुर्डुवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com