सोलापूर : ताडीविरोधात ‘आम आदमी’ एकवटली

परवाना शास्त्रीनगरचा अन्‌ दुकान तुकाराम नगरमध्ये
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात ३८ हजार शिंदीची झाडे आहेत, असे भासवून शहरात १० ठिकाणी सरकारमान्य ताडी विक्री दुकाने सुरू करण्यात आली आहेत. या प्रकाराविरुद्ध आम आदमी पार्टी आता एकवटली असून, महिलांच्या सह्या घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात शास्त्रीनगरचा परवाना असताना संत तुकाराम नगरमध्ये ताडी दुकान सुरू असल्याचा प्रकार आम आदमी पाटीने निदर्शनास आणून दिला आहे.

जिल्ह्यात सध्या ३८ हजार शिंदीची झाडे आहेत, असे पुरावे दाखवून शहरात दहा ठिकाणी ताडीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १८ तर शहरात १४ ठिकाणी ताडी विक्रीला परवाने देण्यात आले आहेत. शहरात ज्या वसाहतीत शाळा, हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणीही ताडीची दुकाने सुरू आहेत. याबाबत यापूर्वीच आम आदमी पार्टीने जिल्हा प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदने दिली आहेत. या परिसरातील नागरिकांना या दुकानांचा त्रास होत असून, ती त्वरित बंद करावीत, अशी मागणी होत आहे.

संत तुकाराम नगर येथे भर वस्तीत ताडीखाना सुरू आहे. या रस्त्यावरून शेकडो महिला, मुलींची ये-जा असते. त्यांना या ताडी दुकानांचा त्रास होत आहे. ही दुकाने बंद करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

- खतीब वकील, जिल्हा कार्याध्यक्ष, आम आदमी पार्टी

नैसर्गिक ताडीच्या नावाखाली रासायनिक ताडीची विक्री केली जात आहे. जिल्ह्यात ३८ हजार ताडीची झाडे असल्याचे प्रशासनाने भासवले आहे. दोन वर्षात इतकी झाडे कशी वाढली, याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने द्यावे. जेथे हॉस्पिटल आणि शाळा आहेत तिथे ताडी विक्री कशी सुरू आहे?

- मल्लिकार्जुन पिलगेरी, सदस्य, श्रमिक विकास संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ashadhi Wari 2026 MSRTC special buses
solapur city police
solapur
Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
Marathi News Esakal
www.esakal.com