Solapur : पेनुर मोहोळ जवळ अपघात, तिघांचा जागीच मृत्यू अन्य दोघे जखमी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : पेनुर मोहोळ जवळ अपघात, तिघांचा जागीच मृत्यू अन्य दोघे जखमी.

मोहोळ : विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर ने अॅमेज कारला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर हद्दीतील एका पेट्रोल पंपा समोर शुक्रवार ता ११ रोजी रात्री दहा वाजता झाला. प्रशांत एकनाथ शेटे वय ३५, सुरज दिलीप कदम वय २५, ऋषिकेश रामकृष्ण साखरे वय २५ तिघेही रा विजापुर गल्ली पंढरपूर अशी मृतांची नावे आहेत, तर दत्तात्रेय श्रीमंत कोकाटे रा तांबोळे व दत्तात्रेय बाळासाहेब देवकते रा कोन्हेरी अशी जखमींची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, वरील तिघे पंढरपूरहुन अमेज कार क्रमांक एम एच १३ डीएम ९५६२ मधून पंढरपुरा हून सोलापूरला शोरूम ला जाऊन येतो असे सांगून घरातून सकाळी गेले.

रात्री उशिरा परत येताना त्यांची कार पंढरपूर- मोहोळ पालखी मार्गावरील पेनुर हद्दीतील एका पेट्रोल पंपाजवळ आली असता त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक एम एच १३ ए एक्स ४४५ हिने अॅमेज कारला जोराची धडक दिली, त्यात वरील तिघा जणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण जखमी झाले. या अपघाताची फिर्याद दतात्रय नारायण जाधव वय ६५ रा लोकमान्य नगर ठाणे यांनी मोहोळ पोलीसात दिली असून अधिक तपास अपघात पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जयंत पवार करीत आहेत. दरम्यान घटना स्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी भेट दिली.