सोलापूर : बालकामगार ठेवल्यास होणार कारवाई

आपणास धोकादायक उद्योगात बालकामगार असल्याची माहिती
बालकामगार
बालकामगारsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विडी उत्पादक व यंत्रमाग उत्पादक कारखाने, दुकाने, गॅरेज, हॉटेल आस्थापनांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, अन्यथा आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने दिला आहे.

आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूरमार्फत बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ नुसार बालकामगार कामावर ठेवणे गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये दोन वर्षांपर्यंत सक्षम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपणास धोकादायक उद्योगात बालकामगार असल्याची माहिती असेल अथवा आढळल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, कामगार कल्याण भवन, दमाणी नगर, सोलापूर येथे तक्रार करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur State Excise Department raids illegal liquor manufacturing facility
Social Media
mohol kirti kisan shejal suicide icici bank employee anna bhau sathe nagar mohol police solapur
बेरोजगारी
Marathi News Esakal
www.esakal.com