
सोलापूर : फ्लाय ९१ या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.