Solapur News : चिमणी पडून महिना लोटला, प्रत्यक्ष विमान काही उडेना

अन्य अडथळे निघण्याची आता प्रतीक्षा; विमानसेवेचे भवितव्य पुन्हा ‘हवे’तच राहू नये ही अपेक्षा
solapur news
solapur newssakal
Updated on

सोलापूर - बहुप्रतीक्षित अन्‌ बहुचर्चित सोलापूरच्या विमानसेवेचं भवितव्य पुन्हा ‘हवे’त असल्याची सध्याची तरी वास्तव स्थिती आहे. इथल्या विमानसेवेचा मार्ग पुन्हा अनेक अडथळ्यांची शर्यतीमधून जात आहे.

विमानेसेवेला अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वादग्रस्त चिमणीच्या पाडकामानंतर लगेच विमानसेवा सुरु होईल, या अपेक्षेला तिलांजली मिळत आहे. विमानतळ परिसरातील वीस एकरांवरील अतिक्रमणं अन् उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या अडथळ्यांसह अन्य काही अडथळे विमानसेवा सुरु होण्याला आहेत.

solapur news
Solapur News : सामाजिक क्रांतीसाठी शिक्षण प्रभावशाली माध्यम - आमदार समाधान आवताडे

दरम्यान, चिमणी पडून महिना लोटला, मात्र प्रत्यक्ष विमान उडणार कधी? हाच प्रश्‍न सोलापूरकरांच्या मनामधील आहे. तोच प्रश्‍न सध्या अनुत्तरीत राहात आहे. मुख्य अडथळा असणाऱ्या चिमणीच्या पाडकामानंतर अन्य अडथळे दूर करण्यासाठीच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत.

सोलापूरचे हित पाहता विमानसेवेचा पहिल्यापासून आग्रह धरणाऱ्या सोलापूर विकास मंचचा सेवा सुरु होण्यासाठी पाठपुरावा सुरुच आहे. तथापि, विमानसेवेच्या मागणीला मूर्त स्वरूप येणं महत्त्वाचं आहे. इथल्या विमान लॅडिंगचं भवितव्य पुन्हा हवेतच राहू नये, ही तमाम सोलापूरकरांची इच्छा आहे.

solapur news
Solapur News : मसाल्याला बसला महागाईचा तडका; गृहिणींचे बजेट कोलमडले; बाजारपेठेवरही परिणाम

भाजपनं आता पेलावं आव्हान

होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान उभे आहे. चिमणी पाडल्यानंतर कामगार आणि शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणारा लिंगायत समाज यामुळे दुखावला गेला आहे. त्यात विमानसेवा सुरू न झाल्यास इतर वर्गही नाराज होणार आहे.

त्यामुळे उड्डाण योजनेंतर्गत सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे आव्हान भाजपसमोर उभे आहे. तथापि, विमानसेवा चालू करण्यासंदर्भात भाजपनं सक्षमपणे आव्हान पेलून इथली विमानसेवा सुरु करायला हवी.

उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे केंद्रीय उड्डाणमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात विमानसेवा कधी सुरू होणार? याबाबतचे उत्तर सध्या तरी ठोसपणे कोणाकडे नाही.

solapur news
Solapur Crime : जीवे मारण्याची धमकी देऊन मित्राकडूनच उकळले दहा लाख

मंचचा पाठपुरावा अखंडपणे सुरूच पण...

सोलापूरच्या औद्योगिक पिछाडीला विमान सेवा सुरु नसण्याचे मुख्य कारण आहे. विमानसेवेअभावी गेल्या १५ वर्षात मोठे उद्योग सोलापुरात आले नाहीत. परिणामी येथे बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला. सर्वच क्षेत्रामधील गुंतवणुकीला मर्यादा राहिल्या. सोलापूरच्या एकूण विकासाला खीळ बसली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, सोलापूरची विमानसेवा चालू व्हायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका सोलापूर विकास मंचने सुरवातीपासून घेतली. सोलापूरकरांना सोबत घेऊन आपला लढा अखंडपणे चालू ठेवला. विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या चिमणीच्या पाडकामासाठी मंचने दिलेला लढा तर खूप मोठा होता.

या लढ्याला यश मिळाले. चिमणीच्या पाडकामानंतर इथली विमानसेवा चालू होण्यासाठी मंचचे संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना, संबंधितांना निवेदने देण्याचा ‘सिलसिला’ ठेवला.

विमानसेवेसाठी सातत्याने कैक वर्षाचा पाठपुरावा ठेवण्याचे औदार्य आपल्या सोलापूरसाठी मंचने दाखविले आहे. हे कौतुकास्पद आहेच. विमानसेवेसाठी त्यांच्या लढण्याला, झगडण्याला, प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळायला हवं बस्स इतकंच.

लक्ष्यवेधी...

विमानसेवेमधील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासन अजून व्हावे गतिमान.

अडथळे काढण्यासाठी स्थानिक प्रशासनावर मंत्रालय स्तरावरून दबाव येण्याची गरज.

चिमणी पाडकामासाठी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री जसे होते आग्रही तसे संबंधितांनी आतादेखील व्हावे आग्रही.

उर्वरित अडथळे काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आणावे तातडीच्या ‘ॲक्शन’ मोडवर.

अन्य अडथळे दूर करण्यासाठी महसूलसह महापालिका प्रशासनाला उच्च स्तरावरून ‘ऊर्जा’ मिळण्याची आवश्‍यकता.

चिमणी पाडल्यानंतर होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

विमानसेवा सुरू करण्यासाठी जे काही अडथळे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे बैठक लावण्यात येणार आहे. सुरक्षित विमानसेवा सुरू करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.

- बनोत चांपला, व्यवस्थापक, होटगी रोड विमानतळ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com