
Solapur : नवीन वर्षाचा प्रारंभामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने अक्कलकोट येथे महत्वाची बैठक
अक्कलकोट : वर्ष अखेर व नवीन वर्षाचा प्रारंभामुळे श्री स्वामी समर्थ मंदिरात होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने श्री.राजेंद्रसिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालय अक्कलकोट येथे प्रशासकीय अधिकारी,मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ ट्रस्ट यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी ख्रिसमसपासुन भाविकांची होत असलेले गर्दी आणि वर्ष अखेर व नवीन वर्ष प्रारंभ यामुळे अक्कलकोट शहरात छोटे -मोठे वाहन मंदिर परिसराकडे येऊन गर्दी करणार नाहीत. श्री दत्त जयंती उत्सवात करण्यात आलेले नियोजना प्रमाणेच उपाययोजना नगरपालिका यांचेकडून करण्यात यावेत. तसेच मंदिर परिसरातील महत्वाचे 04 ठिकाणी PA सिस्टीम (लाऊड स्पीकर) व्यवस्था करणेबाबत श्री राजेंद्रसिंह गौर यांनी सुचना केलेल्या आहेत, त्यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, मैंदर्गी नाका,भक्त निवास हत्ती तलाव, समाधी मठ या ठिकाणी लाकडी बॅरेंगेटिंग करण्यात येणार असुन सध्या लोखंडी स्वरूपाचे चाकाचे बॅरेंगेटिंग तयार करण्यात आले असले बाबत सांगितले
.तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर,अन्नछत्र मंडळ, भक्तनिवास, मैंदर्गी नाका,या ठिकाणी वाहनांची गर्दी न होता भाविकांना दर्शन घेणे सुलभ होईल कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने मंदिर परिसरात चारचाकी वाहने येणार नाहीत ते बाह्य वळणाने(बायपासने) बाहेरच जातील याबाबत पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांना नियोजन करणे बाबत सांगण्यात आले आहे.छोट्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कमलाराजे चौक , हत्ती तलाव जवळ बासलेगाव रोड, श्री स्वामी समर्थ दवाखाना मैंदर्गी रोड , अन्नछत्र मंडळ याच ठिकाणी करण्यात आलेले आहे.
अन्नछत्र मंडळातअसलेली पार्किंग व्यवस्था मैंदर्गी रोडच्या बाहेर पडणाऱ्या गेट मधुनच प्रवेश करेल आणि तेथुनच बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याबाबत श्री अमोलराजे भोसले यांनी सहमती दर्शविली आहे.मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ यांना,राजेंद्रसिंह गौर यांनी मंदिरातील दर्शन रांग, भाविकांना रांगेत पिण्याची पाण्याची व्यवस्था,उन्हात जास्त वेळ थांबावे लागले तर बाहेरील दर्शन रांगेत मंडपची व्यवस्था करण्यात यावी,
त्यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष हे श्री महेश इंगळे आणि अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री अमोलराजे भोसले यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.वर्ष अखेर व नवीन वर्ष निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिरात 4 अधिकारी 45 पोलीस कर्मचारी,10 वाहतुक कर्मचारी,10 महिला कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे श्री राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.बैठकीला तहसीलदार बाळासाहेब सिरसाट,
मुख्याधिकारी सचिन पाटील,
पोलीस निरीक्षक महेश स्वामी ,नायब तहसीलदार श्रीकांत कांबळे ,श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,सचिव शामराव मोरे ,प्रशांत भगरे,नगरपरिषदचे विठ्ठल तेली,कार्यालयाचे धनराज शिंदे, गोपनीय कर्मचारी शरद चव्हाण, राहुल सुर्यवंशी आदी उपस्थित होते.