सोलापूर : अकलूज आगारातील एसटी वाहतूक पूर्ववत

७० टक्के कर्मचारी झाले हजर; बडतर्फ ५९ कर्मचारी गेले अपिलात
Solapur Akluj depot ST Transportation Same as before
Solapur Akluj depot ST Transportation Same as before sakal
Updated on: 

अकलूज : कोरोना महामारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे दोन वर्षांपासून बंद असलेली लालपरी आता पूर्ववत धावू लागली असून अकलूज आगारातून जवळजवळ सर्वच मार्गावरच्या गाड्या सुरू केल्या असल्याने प्रवाशांसह उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाणाऱ्यांची गैरसोय झाली आहे.

कोरोना महामारीमुळे प्रथम आंतरजिल्हा व नंतर जिल्ह्यातीलही एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. कोरोना काळातही एसटीने परराज्यातील लोकांना रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी एसटी उपलब्ध करून दिली होती. कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल झाले. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे लालपरी सुरू झालीच नाही. या काळात प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. परंतु खासगी वाहनांकडून जास्त पैसे आकारले जात असल्याने सामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

सुमारे पाच महिने चाललेल्या संपानंतर आता लालपरी पुन्हा धावू लागली असून अकलूज आगारातून हैदराबादसाठी दोन फेऱ्या (सकाळी ७.४५ व ८.३० वाजता), मुंबई (६.०० वाजता), नाशिक (७.४५ वाजता), औरंगाबाद (९.१५ वाजता), कोल्हापूर (११.०० वाजता), चिपळूण (११.०० वाजता), पुणे (७.०० व १२.३० वाजता) या गाड्या सुरू केल्या असून संप काळात सुरू असलेल्या सोलापूर, टेंभुर्णी, पंढरपूर, सांगोला, नातेपुते या मार्गावरील एसटी चालूच राहणार आहेत. अकलूज आगारातील सुमारे ७० टक्के कर्मचारी आजखेर हजर झाले असून बडतर्फ केलेल्या एकूण ५९ कर्मचाऱ्यांनी अपिल दाखल केले असून त्यांची सुनावणी चालू आहे. आता अकलूज आगारातून जवळजवळ सर्व मार्गावर एसटी सुरू केल्या असून प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख तानाजी पवार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol News Three Unknown Men Target 85 Year Old Woman in Shetphala by Offering Milk and Steal Gold Ornaments Worth 50000 Rupees
Solapur Crime
Krishna Mohite
voting
Marathi News Esakal
www.esakal.com