
Daring Robbery In Solapur's Avanti Nagar
sakal
Solapur Crime: शहरातील अवंती नगरातील एका सोसायटीत चौघा चोरट्यांनी लहान मुलासह कुटुंबियांच्या गळ्यावर चाकू लावून दोन घरांत धाडसी चोरी केली. शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर दोन ते तीन या वेळेत चोरट्यांनी घरांचे दरवाडे तोडल्यानंतर कुटुंबीयांना वेठीस धरून एक लाख १४ हजारांचा ऐवज लुटून नेला.