
अरविंद मोटे
सोलापूर : होटगी रोड येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अद्यापही या मार्गावरील तिकीट बुकिंग सुरू झाली नाही. उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याने प्रवाशांना तिकीट बुकिंग सरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.