सोलापूर : "भिमा ची अंतीम मतदार य़ादी प्रसिध्द" सभासदांची संख्या वाढली

मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर
Solapur Bhima Co operative Sugar Factory election Final voter list announced
Solapur Bhima Co operative Sugar Factory election Final voter list announcedsakal

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, कार्यक्षेत्रातील 6 गटांमध्ये 19 हजार 487 एवढे मतदार मतदानासाठी पात्र असल्याची माहिती साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांनी दिली. यामुळे आता लवकरच भीमा कारखान्याच्या निवडणुकीचा निवडणुक कार्यक्रम लवकरच जाहिर होणार असून या मतदार यादीकडे सभासदांचे लक्ष लागले होते.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे . संस्थेच्या सभासदांना या यादीवर दावे व आक्षेप दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मतदार यादीवरील दावे व आक्षेप अर्जाच्या माध्यमातुन एकुण 1 हजार 852 हरकती आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी होऊन भाग भांडवलाची रक्कम पूर्ण केलेल्या 796 सभासदांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

विरोधकांनी कार्यक्षेत्रात नाहीत म्हणून आक्षेप घेतलेल्या 2125 सभासदांचे सभासदत्व प्रादेशिक सहसंचालकांनी रद्द केले होते. सहकार मंत्र्यांनी या निकालाला स्थगिती दिली होती.194 सभासदांच्या नावे स्थगिती दिली होती. ही नावे यादीत समाविष्ट करण्याबाबत आदेश दिला होता, परंतु यापैकी 80 सभासदांनी भाग भांडवलाची रक्कम पूर्ण केल्यामुळे त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत.

विरोधकांच्या चुकीच्या निर्णयामुळे भिमाचे काही सभासद मतदानापासून वंचित राहणार आहेत, परंतु सभासद म्हणून कारखान्याकडून ज्या काही सोयीसुविधा त्यांना मिळणार आहेत त्या मिळातील.

- सतीश जगताप उपाध्यक्ष भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com