Solapur : भिमा च्या काटयात तफावत आढळली तर मोठे बक्षीस देऊ; विश्वजीत महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Bhima Cooperative Sugar Factory Vishwajit Mahadik

Solapur : भिमा च्या काटयात तफावत आढळली तर मोठे बक्षीस देऊ; विश्वजीत महाडिक

मोहोळ : टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष खा धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वजीत महाडिक यांनी शुक्रवार ता २८ पासून "ऊस पीक परिसंवाद" दौऱ्याचे आयोजन केले असून शुक्रवारी त्यांनी कोन्हेरी, हिवरे, सारोळे, खवणी, पोखरापूर, तांबोळे, सौंदणे या गावांचा दौरा केला. दौऱ्याला सभासद शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विश्वजीत महाडिक यांनी सांगितले.

कोन्हेरी ता मोहोळ येथे बोलताना विश्वजीत महाडिक म्हणाले, सध्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जरी सुरू असली तरी, कारखाना सुरळीत चालवणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.सभासदांचा ऊस वेळेत गाळप करून त्यांची बिले वेळेत देण्याचा कारखाना प्रशासनाचा प्रयत्न आहे.

इतर कारखान्याच्या व भिमा च्या काट्यातील फरक तपासा. कुठल्याही काट्यावर उसाचे वजन करा व तो ऊस भिमा च्या काटयावर ही वजन करा तफावत आढळली तर मोठे बक्षीस देण्याची घोषणा महाडिक यांनी केली. भिमा चा काटा चांगला असल्याची महाराष्ट्रात चर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यांनी यावेळी सभासद शेतकऱ्यांच्या उसा बाबतच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या खासदार महाडिक यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या दौऱ्या निमित्त गावोगावी सभासदांची मोठी गर्दी होत आहे. त्यांनी आजारी असलेल्या सभासदांची ही त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या ऊस पीक परिसंवाद दौऱ्यात त्या त्या गावचे सभासद, महाडिक प्रेमी कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही विश्वजीत महाडिक यांनी सांगितले.