सोलापुर : भिमा ची निवडणुक बिनविरोध व्हावी; खासदार धनंजय महाडिक

कारखान्यावर इथेनॉल प्रकल्प उभारणार
खासदार धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक sakal
Updated on

सोलापुर मोहोळ भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील नेत्यांना विनंती करणार आहे पंढरपुरचे आमदार प्रशांत परिचारक हे सकारात्मक आहेत अनगरकरांनी यापूर्वी खूप त्रास दिला आहे मात्र इथून पुढे ते सहन केले जाणार नाही अथवा दबाव ही चालणार नाही. काही अडचणी आणण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास "करारा जवाब मिलेगा" शेतकरी केंद्रबिंदू मानून मिळालेल्या खासदारकी चा उपयोग त्यांच्यासाठी करणार असून भीमा भविष्यात इथेनॉल प्रकल्प राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या खासदारकीची विजयश्री खेचून आणली यामुळे कर्मचारी वृंद व भीमा परिवाराच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार महाडिक बोलत होते याच कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे अध्यक्षस्थानी होते. खासदार महाडिक यांचा मनोहर डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाडीक पुढे म्हणाले, भीमा कारखाना सुरू होऊ नये यासाठी विरोधकांकडून मोठे प्रयत्न झाले, आरआरसी ची कारवाई करण्यास भाग पाडले त्यामुळे भीमा अडचणीत आला,

सहकारी साखर कारखाना एका रात्रीत खाजगी कसा केला याची सर्व माहिती माझ्याकडे आहे यापुढे त्रास देणे थांबले नाही तर जशास तसे उत्तर मिळेल. येत्या दोन ते तीन दिवसात भीमाची निवडणूक जाहीर होईल सर्वजण बसून विचार करूनच उमेदवारी अर्ज भरूया, परस्पर कोणीही कुठलाही निर्णय घेऊ नये. मी खासदार होईल का नाही याची मला खात्री नव्हती मात्र शेवटच्या पंधरा मिनिटाच्या यादीत माझे नाव आले. मला भाजपाने भरभरून दिले आहे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या चाणक्यनिती मुळेच मला ही संधी मिळाली असून, भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढीसाठी मिळालेल्या संधीचे सोने करेन असे त्यांनी सांगितले. यापूर्वी विजयाचा गुलाल आम्हाला हुलकावणी देत होता,मात्र आता विजयाचा गुलाल कधीच हटणार नाही.

आम्ही सत्तेत नसल्यामुळे वर्षभर तोंडही न दाखवणारे माझ्या मिरवणूकीत नाचायला होते. यावेळी मोहोळ शहर भाजपचे अध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी भविष्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुका खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी विठ्ठल चे अध्यक्ष भगीरथ भालके, संत शिरोमणी चे अध्यक्ष कल्याण काळे, खासदार महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक, अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, पवन महाडिक, छोटु महाडिक,विजय महाडिक, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, संजय क्षीरसागर, सुशील क्षीरसागर, झाकीर मुलाणी, सर्जेराव चवरे, महादेव देठे,बी बी जाधव, शिवाजी गुंड, तानाजी गुंड, शंकर वाघमारे, राजू बाबर, पांडुरंग ताटे, संग्राम चव्हाण, भीमराव वसेकर, धोंडीबा उन्हाळे, सर्व संचालक खातेप्रमुख त्यांचे सर्व सहकारी तसेच पापरी, खंडाळी, कोन्हेरी, .येवती, पाटकुल, सौंदणे, आदी गावातील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
drug
Marathi News Esakal
www.esakal.com