Praniti Shinde remarks controversy
esakal
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल भाजपचे ‘सोलापूर शहर मध्य’चे आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि काँग्रेसमधील वाद चिघळला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आमदार कोठे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर कोठे यांनी गुरुवारी रात्री फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करीत नरोटे यांच्यावर टीका (Devendra Kothe Chetan Narote controversy) केली. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास देगाव रोडवरील मरिआई चौकात दोघेही आमनेसामने आले. त्यांच्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढू नये यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी शुक्रवारी दोघांची भेट घेऊन मध्यस्थी केली.