
सोलापूर : भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मुंबईतील आकाशवाणी या आमदार निवासात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकदा फोन करूनही १०८ क्रमाकांची रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे शेवटी पोलिस व्हॅनमधून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. पण, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. चंद्रकांत धोत्रे (रा. पाथरूट चौक) असे त्या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे.