Solapur MIDC Couple Case
esakal
सोलापूर : कर्नाटकातील विजयपूर येथील एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ धानप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय ३५) या युवा दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. २७) सकाळी सहाच्या सुमारास अक्कलकोट रोड एमआयडीसीतील कलावती नगरात ही घटना (Solapur Akkalkot Road MIDC Case) उघडकीस आली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतून विजयपूरच्या तरुणाने ओळख वाढवून त्रास दिल्याचे स्पष्ट झाले आहे.