
सोलापूर : मरवडे विषबाधा प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल
मरवडे (सोलापूर) : मरवडे (ता.मंगळवेढा) येथे विषबाधेमुळे दोन बहिणींचा मृत्यू (Sisters Death) प्रथम दर्शनी तपासावरून दुग्धजन्य पदार्थामधून (Dairy Food) झाला असल्याच्या संशयावरून मंगळवेढा येथील दोघा जणांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांच्या फिर्यादीवरून श्री समर्थ डेअरीचे संतोष लहू कोंडूभेरी व आकाश धोंडीराम फुगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदार यांनी श्रीखंड, बासुंदी, रबडी व पनीर हे अन्न पदार्थ यातील साक्षीदार यांनी समर्थ डेअरी मंगळवेढा येथून खरेदी केले होते.
हेही वाचा: सोलापूर : मंगळवेढा हायवे बनला मृत्यूचा सापळा! अपघातांची मालिका चालूच
यातील श्रीखंड, बासुंदी, रबडी मरवडे येथील चव्हाण कुटूंबातील सर्व सदस्य आबा दगडू चव्हाण (वय 37 ), पत्नी सुषमा आबा चव्हाण (वय 36) मुलगी भक्ती आंबा चव्हाण (वय 6) तर दुसरी मुलगी नम्रता आबा चव्हाण (वय 4) तसेच वडील दगडू यल्लाप्पा चव्हाण (वय 70) वर्ष यांनी खाल्ले. हे पदार्थ खाल्यानंतर उलटी, जुलाब, मळमळ, पोटदुखी हा त्रास होऊ लागल्याने तात्काळ चौघेजण उपचार करिता मंगळवेढा व पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान मंगळवेढा येथील खासगी दवाखान्याने गुरुवार (दि.23) रोजी पहाटे 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास भक्ती आबा चव्हाण हिस मयत घोषित केले तर नम्रता आबा चव्हाण हिस शुक्रवार (दि.24) रोजी पहाटे 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथील खासगी दवाखान्याने मयत घोषित केले.
हेही वाचा: पुणे : शहरात पुन्हा निर्बंध लागू
म्हणून मरवडे येथील दोन मुलींना अन्न विषबाधा प्रथम दर्शनी तपासावरून दुग्धजन्य पदार्थामधून झाले असल्याच्या संशयावरून संतोष लहू कोंडूभेरी व आकाश धोंडीराम फुगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम व नियमन 2011 कलमांचे उल्लंघन केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे करीत आहेत.
Web Title: Solapur Case File Poisoning Two Criminal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..