Solapur : मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसादिवशीच शेतकऱ्यांची वीज तोडणी ; डॉ. बाबासाहेब देशमुख

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर होतेय चर्चा
डॉ. बाबासाहेब देशमुख
डॉ. बाबासाहेब देशमुखsakal

सांगोला : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांची नातू डॉ. बाबासाहेब देशमुख सोशल मिडीयावर सक्रिय आहेत. ते सतत विविध विषयावर पोस्ट शेअर करत असतात. गुरुवार (दि. ८) फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी अभिष्टचिंतन व वीजतोडणीबाबत पोस्ट केली होती. सदरची पोस्टवर चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. या पोस्टवर मोठ्या कमेंट्स सुद्धा सुरू झाल्या.

"जन्मदिनाचे औचित्य साधून गावोगावचा वीज पुरवठा तोडला जात आहे आणि तुम्ही शुभेच्छांचा स्वीकार करत आहात! हे कसले अभिष्टचिंतन वाढदिवसाचे करता आहात? जन्मदिनी काहीच मागणी करत नाही, पण किमान आहे ते भरास आलेले पीक तरी घरात येऊ द्या. हातात पडू द्या शेतकरी गोरगरिब जनतेला तुम्ही आधार देण्याऐवजी, गावोगावची वीजतोडणी करून जन्मदिवसाचे परतावा/रिटर्न गिफ्ट देत आहात का? तुम्ही मोठे आहात मान्य आहे.

अन्यायाविरोधात लढा धेऊन तुम्ही सर्वांचा रोष ओढवून सरकार स्थापन केलंत पण आज काय अवस्था जनतेची आहे हे ही लक्षात घ्या. गावोगवची वाजतोडणी जोमात चालू आहे, या अन्यायाची वाचा फोडावा तर कोणासमोर? तुमचा वाढदिवस आहे. दीर्घायुष्याच्या तुम्हास शुभेच्छा! वाढदिवस भव्यदिव्य साजरा करा, पण सोबतच शेतकरी- कामगारांचे हित ही लक्षात ठेवा." असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावर सर्वत्रच मोठी तर सुरू झाली यावर सत्ताधारी व विरोधकांचे कार्यकर्त्यांच्या कमेंट्सही चांगल्याच रंगू लागल्या आहेत.

शेतकरी आधीच संकटात आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय असे असताना शेतकर्‍यांकडून थकित वीजबिलाची वसुली केली जातेय. सरकारने शेतकर्‍यांची वीजतोडणी करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com