इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना आक्रमक ; सायकल-बैलगाडी रॅली, जोडोमार आंदोलनातून आक्रोश

Solapur city and district Shiv Sena on Saturday staged agitation on the issue of fuel price hike in Solapur 2.jpg
Solapur city and district Shiv Sena on Saturday staged agitation on the issue of fuel price hike in Solapur 2.jpg
Updated on

सोलापूर : केंद्र सरकारचे अपयश, इंधन दरवाढ या मुद्यांवर सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना शनिवारी आक्रमक झाली. इंधन दरवाढीच्या विरोधात चार हुतात्मा पुतळ्यापासून सायकल-बैलगाडी रॅली काढण्यात आली. शेतकरी विरोधी कायदा तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जाळण्यास मज्जाव केल्यानंतर पुतळ्यास जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

हे ही  वाचा : पंढरपुरात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन
 
यावेळी माजी आमदार दिलीप माने, शिवसेना नेते प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, महेश देशमुख, युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, भारत बडूरवाले, विठ्ठल वानकर, उपजिल्हा प्रमुख अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, प्रताप चव्हाण यांच्या उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा ते डफरीन चौक पेट्रोल पंपापर्यंत सायकल व बैलगाडी रॅली काढण्यात आली. 

जनतेचा अपेक्षाभंग 

सर्वसामान्य माणसांचे महागाईने व इंधन दरवाढीने कंबरडे मोडले आहे. ज्या अपेक्षेने जनतेने केंद्रातील भाजप सरकारला निवडून दिले, त्याचा अपेक्षाभंग झाला आहे. सरकार निवडून येऊन दुसरी टर्म झाली. तरीसुद्धा इंधन दरवाढ कमी झालेली नाही. वाचाळवीर रावसाहेब दानवे यांचा डीएनए पाकिस्तानचा आहे का? याची तपासणी करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख वानकर यांनी केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com