सोलापूर (दक्षिण तालुका) : सोलापूर जिल्ह्यातील विंचूर गावामध्ये (Solapur Girl Case) एका 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या (College Student) आत्महत्येची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डबा विसरल्याने घरी परतलेली श्रेया पुंडलिक गायकवाड या तरुणीने राहत्या घरी पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय.