Solapur News: इथेनॉलसाठी मका महागलाl; छोटे भरडा प्रकल्प बंद; ४५ किलोच्या पिशवीत ३०० रुपयांची वाढ

इथेनॉलसाठी वाढलेल्या मागणीमुळे मक्याचा तुटवडा, दर प्रतिक्विंटल २,९०० रुपयांवर; छोटे भरडा प्रकल्प ठप्प, पशुखाद्य उद्योगावर मोठा फटका
Solapur News

maka Solapur News

esakal

Updated on: 

सोलापूर : इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची वाढलेली मागणी, खरीपातील घटलेले क्षेत्र आणि पावसाअभावी उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे मक्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चाऱ्यासाठीही मक्याचा वापर वाढला आहे. मक्याचा दर प्रतिक्विंटल २ हजार ८०० ते २ हजार ९०० रुपयांवर पोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक छोटे मका भरडा प्रकल्प बंद पडले आहेत.मक्याच्या तुटवड्याचा पशुखाद्य उद्योगाला फटका बसला. दोन महिन्यांत ४५ किलो मका भरड्याच्या पिशवीचा दर १ हजार १५० रुपयांवरून १ हजार ४५० रुपयांवर पोचला. सुग्रास व गहू भुस्साच्या मागणीतही वाढ झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com