सोलापुरात कोरोनाने घेतला पुन्हा तिघांचा बळी; रात्रीत वाढले नऊ रुग्ण, एकूण बाधित 860

In Solapur Corona took three more victims
In Solapur Corona took three more victims
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या व कोरोनामुळे मृत  पावणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज शनिवारी  सकाळी आठ वाजेपर्यंत  3 जणांचा मृत्यू झाला असून  9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सोलापुरातील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या आता 860 झाली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 78 झाली आहे. आज शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे  54 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 9 पॉझिटिव्ह आले असून  त्यामध्ये पाच पुरुष चार महिलांचा समावेश आहे.  45 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत मृत्यू पावलेल्या तीन व्यक्तींमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सहा हजार 860 इतकी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी सहा हजार रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 860  पॉझिटिव्ह आले आहेत. 351 जण कोरोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com