BREAKING......! डेंगळे-पाटील यांचे सोलापूर महापालिकेत पुनश्च हरिओम

BREAKING......! डेंगळे-पाटील यांचे सोलापूर महापालिकेत पुनश्च हरिओम
Updated on

सोलापूर - महापालिकेतील माजी उपायुक्त त्र्यंबक डेंगळे-पाटील पुन्हा सोलापूर महापालिकेत अतिरीक्त आयुक्त म्हणून रूजू होण्याची शक्यता आहे. आयुक्त कार्यालयानेच तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. सचिवांची स्वाक्षरी झाली की श्री. डेंगळे-पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश निघू शकतो. 

श्री. डेंगळे पाटील उपायुक्त असताना शहरातील गाळ्यांचा प्रश्न तसेच घनकचरा व्यवस्थापानाबाबत चांगले नियोजन केले होते. प्रत्येक घंटागाड्यांना जीआयएस सिस्टम बसविण्याची कार्यवाहीही त्यांच्याच कालावधीत झाली होती. दरम्यान त्यांची बदली झाल्यावर महापालिकेतील मुख्य लेखापरिक्षक अजयसिंह पवार यांच्याकडे उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.

तत्कालीन अतिरीक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. दरम्यानच्या कालावधीत दोन सहायक आयुक्त आणि एक उपायुक्त रुजु झाले. अतिरीक्त आयुक्तपद हे सध्या रिक्तच आहे. त्या जागेवर श्री. डेंगळे-पाटील यांची नियुक्ती होण्याचे संकेत आहेत. त्यांच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडूनच गेल्याने त्यांचा आदेश निघण्याची औपचारिकता बाकी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Professors will now mark biometric attendance in class biometric attendance
solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
Marathi News Esakal
www.esakal.com