esakal | सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक तब्बल `इतके` कोटी रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक तब्बल `इतके` कोटी रुपये

सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक तब्बल `इतके` कोटी रुपये

sakal_logo
By
विजयकुमार सोनवणे


सोलापूर : पाणीपट्टीसह कोणत्याही करामध्ये वाढीची शिफारस नसलेले 2020-21 साठीचे 704 कोटी 21 लाख 97 हजार 410 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक शनिवारी सायंकाळी नगरसचिव कार्यालयास सादर करण्यात आले.

म्हणून दिले अंदाजपत्रक नगरसचिवांकडे 
स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अधिनियमातील कलम 35 (अ) नुसार हे अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहे. 

महसूली उत्पन्नातून 516 कोटींचे उत्पन्न अपेक्षित 
सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये महसूली विभागातून 516 कोटी 32 लाख 21 हजार 401 रुपये, तर भांडवली विभागातून 187 कोटी 89 लाख 76 हजार रुपये असे एकूण 704 कोटी 21 कोटी 97 लाख 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूली विभागातून 438 कोटी 73 लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 77 लाख 55 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसूली विभागाच्या खर्चामध्ये 412 कोटी 53 लाख रुपये आणि पाणीपुरवठा विभागावरील खर्च 77 कोटी 55 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली विभागातून 47 कोटी 45 लाख रुपयांची भांडवली कामे करण्यात येणार आहेत. तर अनुदानातून 140 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. 


असे मिळेल उत्पन्न  : महापालिका कर (97 कोटी 28 लाख), निश्‍चित महसुली उत्पन्न (9 कोटी 10 लाख), महापालिका मालमत्तेपासून उत्पन्न (12 कोटी 70 लाख), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क (99 कोटी 79 लाख), विक्री आणि भाडे (1 कोटी 2 लाख), महसुली अनुदान (218 कोटी 62 लाख), गुंतवणुकीतून उत्पन्न (10 लाख), दिलेल्या कर्जावरील व्याज (पाच लाख), इतर उत्पन्न (7 लाख), पाणीपुरवठा उत्पन्न (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये) 

असा होईल खर्च : पगार व भत्ते (207 कोटी 19 लाख), निवृत्तीवेतन व कुटुंब वेतन (75 कोटी 86 लाख), प्रशासकीय खर्च (12 कोटी 49 लाख), देखभाल व दुरुस्ती (50 कोटी 10 लाख), घेतलेल्या व घ्यावयाच्या कर्जावरील व्याज (5 कोटी 80 लाख), कार्यक्रम व योजनांवरील खर्च (29 कोटी 24 लाख), महसुली अनुदाने, देणग्या, योगदाने (9 कोटी 45 लाख), घसारा निधी (15 लाख), महसूली निधीतून वर्ग (44 कोटी 20 लाख), स्थिर मालमत्ता (3 कोटी 98 लाख), कर्जे (25 लाख), पाणीपुरवठा (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये). 

loading image