esakal | Solapur: त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला नापंसती
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation

सोलापूर : त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला नापंसती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीत जे पक्ष आमच्या पक्षांतील कार्यकर्त्यांशी सलोख्याने वागतात, अशा समविचारी पक्षांबरोर आमची आघाडी असेल. शासनाने स्वीकारलेली त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती छोट्या पक्षांसाठी मारक आहे. ही पद्धत आम्हाला पंसत नाही, असे मत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी व्यक्त केले. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनानिमित्त सोलापूर येथे आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शासनाने महापालिका निवडणुकांसाठी लागू केलेली त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत आमच्यासह सर्व छोट्या पक्षांना घातक आहेत. आता शासनाचा निर्णय झालेला आहे. यात बदल होईल असे वाटत नाही, मात्र तरही हा निर्णय आम्हाला पसंत नाही. मागील वेळी भाजपने स्वत:च्या फायद्यासाठी असा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: यशोगाथा : यशस्वी बागायतदार ते द्राक्ष संघाचे संचालक

आता महाविकास आघाडीने हा निर्णय का घेतला हे कळत नाही. महाविकास आघाडीतील घटक अनेक पक्षांना हा निर्णय मान्य नाही. पण माशी कुठे शिंकली हेच कळत नाही, असेही ते म्हणाले. इम्पेरियल डाटा त्वरित जमा करण्यात यावा. अधिक वेळ न घालवता ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सोडवावा. असाच प्रश्‍न कनार्टकमध्ये निर्माण झाला होता, मात्र कर्नाटकने दोन महिन्यांत इम्पेरियल डाटा देत हा प्रश्‍न निकाली काढला. मराठा समाजाच्या आरक्षणसाठी पन्नास टक्केच्या मर्यादेत वाढ केल्यास मराठा आरक्षणाप्रश्‍नही त्वरित सुटेल, असे त्यांनी सांगितले.

‘देगलूर’मध्ये अशोक चव्हाण यांना सहकार्य

अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवली जाईल, इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व महापलिकेत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. पंढरपूर पोटनिवडणुकीत मतदारांत फूट पडली, यामुळे भालके यांचा परभाव झाला होता. याची पुनरावृत्ती नांदेड जिल्ह्यात होऊ नये, यासाठी देगलूर पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासोबत रिपाइं असेल असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top