Solapur: एप्रिल आणि मे या दोन महिन्यात इतर आजारांसाठी दाखल झालेले सात रुग्ण कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आले आहेत. त्याबाबतचा अहवाल अश्विनी हॉस्पिटलने महापालिकेला दिला आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही, असे महापालिकेने म्हटले आहे..देशात पुन्हा कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्यातील मुंबई, ठाणेसह पुण्यात रुग्ण असल्याचे चाचणी अहवालांमध्ये दिसून आले आहे..Global Parents Day 2025: जागतिक पालक दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व.सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातही याबाबत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील खासगी दवाखान्यांना कोरोना रुग्णांबाबत दैनंदिन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत..अश्विनी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस आजारांबाबत दाखल होणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. इतर आजारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये सात वयोवृद्ध रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. पण, याशिवाय शहरात कुठेही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.रुग्ण संख्या अशीएप्रिल : ५मे : २.Solapur Goa Flights: ठरलं एकदाचं! fly 91 कडून सोलापूर-गोवा विमानसेवा 9 जूनपासून; तिकीट विक्री सुरू.- अश्विनी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित असलेले रुग्ण हे बी.पी., किडनी यांसह इतर आजारांसाठी दाखल झाले होते. रुग्णालयाने त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेला दिली आहे. मात्र, खरे पाहता शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना उद्भवण्यासारखे वातावरणही नाही आणि तशी कोणतीच परिस्थिती नाही.- राखी माने, आरोग्याधिकारी, महापालिका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.