Solapur Crime: मोहोळ पोलिसांची मोठी कारवाई, आठ मोटरसायकल केल्या जप्त!

Latest Crime News: मोहोळ पोलिसात गुन्हे ही दाखल होत होते. मात्र संशयित हाती लागत नव्हता.
Solapur Crime: मोहोळ पोलिसांची मोठी कारवाई, आठ मोटरसायकल केल्या जप्त!
Updated on: 

Mohal Latest Marathi News: मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरणाऱ्यास अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन लाख वीस हजार रुपयाच्या आठ मोटरसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिली.

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ शहरातील बँका शासकीय कार्यालये यांच्या समोरून मोटरसायकली चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हे ही दाखल होत होते. मात्र संशयित हाती लागत नव्हता.

दरम्यान ता 4 मार्च 2023 रोजी मोहोळ शहरातील आयडीबीआय बँकेसमोरुन योगेश विठ्ठल गोडगे रा रेल्वे स्टेशन मोहोळ यांची मोटरसायकल चोरीस गेली होती. त्याबाबत त्यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली होती. त्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दयानंद हेबांडे करीत होते.

Loading content, please wait...