सोलापूर : शहरातील गुन्हेगारीत होतेय वाढ

मटका अन्‌ जुगार पुन्हा सुरू दुचाकी चोऱ्याही थांबेनात
crime
crimesakal
Updated on

सोलापूर: किरकोळ कारणावरूनही एकमेकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील मटका व जुगार पुन्हा डोके वर काढू लागला आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण थांबलेले नाही. हाणामारीत लोखंडी रॉड, फायटर, कोयता, चाकू, तलवारीचा वापर होऊ लागला आहे. रुपाभवानी परिसरात काही तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून अश्‍लिल व्हिडिओ काढले होते. जुना पुना नाका परिसरात एका महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील दागिने लंपास झाले होते. एकूणच शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्र असून त्यावर ठोस उपायांची गरज आहे.

शनिवारी (ता. १९) फौजदार चावडी पोलिस ठाण्याअंतर्गत मुरारजी पेठेतील सत्यदेव रामलिंग सारस्वत यांच्या पत्नीचे बॅंक खाते हॅक करून समोरील व्यक्‍तीने ९० हजार रुपये लंपास केले आहेत. दुसरीकडे एमआयडीसी परिसरातील शांती नगरात एका तरुणाला तिघांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. आमच्या गल्लीतील मुलींना का छेडतो म्हणून नदिम शेख, निशो शेख, बाबा शेख (सर्वजण रा. शांती नगर, नई जिदंगी) यांनी अफरोज रमजान नदाफ (रा. शोभादेवी नगर, सितारा चौक) याच्यासह मोईन याला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे कुचन प्रशालेसमोरील पार्किंगमधून चोरट्याने श्रीनिवास अरुण चन्ना (रा. कोंडा नगर) यांची दुचाकी (एमएच १३, बीएच ७६२०) चोरट्याने हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली आहे. तसेच विजापूर नाका परिसरातील एका पान टपरीत चालू असलेल्या मुंबई नावाच्या जुगार, मटक्‍यावर कारवाई करीत विजापूर नाका पोलिसांनी मोहिते व अरुण किसन जाधव या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करताना, इतरांना इजा होईल अशी शस्त्रास्त्रे वापरु नयेत, असे निर्देश नागरिकांना देण्यात आले आहेत. तरीही, जानेवारी ते १९ मार्च २०२२ या कालावधीत जवळपास २६ गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपींनी लोखंडी रॉड, फायटर, चाकू, कायेता, तलवारीचा वापर केल्याची नोंद फिर्यादीत आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्‍यकता आहे, अशी माफक अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

नवा गडी नवा राज

तत्कालीन पोलिस आयुक्‍तांनी अवैध खासगी सावकारकी, मटका, जुगार प्रकरणात कारवाई करताना नगरसेवकांनाही सोडले नाही. अनेक संवेदनशील आंदोलनातही त्यांनी सर्व अधिकारी, अंमलदारांच्या मदतीने उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त म्हणून ऑक्‍टोबर २०२१ मध्ये पदभार स्वीकारला. त्यावेळी अनेकांना धास्ती लागली आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही त्यांची चर्चा होऊ लागली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांनी थेटपणे कारवाईचा बडगा उचलला. पण, शहरात सध्या घरफोडी, चोरी, हाणामारी, जुगार, मटका, दुचाकी चोरी रोखण्यासाठी त्यांना ‘विशेष’ प्रयत्न करावे लागतील, असे जाणकारांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com