सोलापूर : शहरातून दर दोन दिवसाला सरासरी तीन दुचाकी चोरीला जातात ही वस्तुस्थिती आहे. घरफोडी, चोरीच्या घटनाही सुरूच आहेत. आता चोरटे शहरातून महागड्या सायकली देखील चोरून नेत आहेत. .Solapur District Assembly Election Results : दिग्गज राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला सुरुंग.मागील काही दिवसांत चोरट्यांनी शहरातील एमआयडीसी, जोडभावी पेठ पोलिसांच्या हद्दीतून सहा ते साडेसहा हजार रुपये किमतीच्या चार सायकली चोरून नेल्याची नोंद संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे..शहरातील पद्मा नगरातून सहा हजारांची सायकल चोरीला गेल्याची फिर्याद बसवराज रामण्णा गुरव (रा. रोशन शाळेजवळ, मल्लिकार्जुन नगर) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. तर अश्पाक राजेसाब जातकर (रा. प्रियांका चौक, भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत ‘माझी साडेसहा हजार रुपयांची सायकल चोरीला गेली’ अशी फिर्याद नोंदविली आहे. .दयानंद सातलिंगप्पा कलशेट्टी (रा. गंगाधर नगर, अक्कलकोट रोड) यांचीही सहा हजार रुपयांची सायकल चोरट्याने चोरुन नेली असून त्यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. तसेच समर्थ पांडुरंग मगर यांनी एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार साडेसहा हजार रुपयांची सायकल चोरट्याने चोरुन नेली आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत, पण पोलिसांना अजून त्यांचा तपास लागलेला नाही..Uday Narkar : सोलापूर शहर मध्यची फेरनिवडणूक घ्या : उदय नारकर.नागरिकांकडून गस्तीची मागणीशहरातील चोरी, घरफोडीचा अभ्यास करून पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी ‘क्यूआर कोड’ पेट्रोलिंग सुरू केले. गस्तीसाठी नेमलेल्या अंमलदारांनी शहरातील निश्चित केलेल्या त्या-त्या परिसराला भेट देणे अपेक्षित आहे. पण, सण-उत्सव, निवडणुकांमधील बंदोबस्तामुळे पोलिसांना नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करता आले नाही. पण, आता शहरातील चोरी, घरफोडी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमित दिवसा व रात्री पोलिसांची गस्त असावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.