कुर्डुवाडी : ट्रेडिंगमध्ये झालेला नफा काढण्यासाठी कमिशन व टॅक्स भरावा लागेल, असे सांगून भोसरे (ता. माढा) येथील प्राथमिक शिक्षकाला खात्यावर वारंवार पैसे भरावयास सांगून सुमारे २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. .Ahmednagar Municipality : थकबाकीदार मनपाच्या रडारवर.भुताष्टे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले श्रीनिवास मोहिते (रा. भोसरे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्हेरोनिका गुप्ता व सूरज रेली या दोघांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ जुलै २०२४ ते १० सप्टेंबर २०२४ च्या दरम्यान घडली. मोहिते यांना व्हेरोनिका गुप्ता हिने एका बँकेचे नावाच्या सिक्युरिटीज ग्रुपमध्ये ॲड केले. .सदर ग्रुपवर सिक्युरिटीचे ट्रेडिंग अकाउंट उघडण्यासाठी लिंक पाठवण्यात आली. मोहिते यांनी खाते उघडून त्यावर ५ जुलै रोजी ५० हजार व ८ जुलै रोजी ३० हजार असे एकूण ८० हजार रुपयांचे ट्रेडिंग केले. त्यानंतर फिर्यादीला ९ जुलै रोजी ९२ हजार ९६० रुपये मिळाल्याचे दिसले. सदर रक्कम फिर्यादीने खात्यावरुन काढून घेतली. यावरून ट्रेडिंग अॅपवर विश्वास बसल्याने फिर्यादीने ८ लाख ३१ हजार पाचशे रुपये सदर ट्रेडिंग खात्यावर पाठवले. .त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी फिर्यादीने सदर अॅप उघडून पाहिले तेव्हा त्यामध्ये ४० लाख १३ हजार ४७५ रुपये नफा झाल्याचे दिसल्यानंतर रक्कम काढण्यासाठी गेले. पण रक्कम काढता आली नाही. फिर्यादीने ग्रुप ॲडमिनला याबाबत मेसेज पाठविले. त्यावेळी ग्रुप अॅडमिनने नफ्यावरील ९ लाख ३० हजार ६०० रुपये कमिशन भरण्याबाबत मेसेज केला..Solapur Winter : जिल्ह्यात हुडहुडी; तुरीसह गव्हासाठी ठरतेय वरदान .फिर्यादीने ती रक्कमही संबंधित खात्यावर पाठवली. पुन्हा ६ लाख २० हजार ही टॅक्स रक्कम भरण्याचा फिर्यादीला मेसेज करण्यात आला़. फिर्यादीने पुन्हा ही रक्कम बँक खात्यावर ट्रान्स्फर केली. तरीही फिर्यादीला रक्कम काढता आली नाही. फिर्यादी मुंबई येथील सदरच्या पत्त्यावर गेले असता माहिती उपलब्ध झाली नाही. बँकेच्या शाखेने सदर ट्रेडिंग खाते फसवे असून आमच्या बँकेशी निगडित नसल्याचा मेसेज पाठवला. या घटनेत फिर्यादीची एकूण २३ लाख ८२ हजार १०० रुपयांची फसवणूक झाली. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.