
मोहोळ : समाज माध्यमावर व्हिडिओद्वारे हातात पिस्टल घेऊन पिस्टल लोड असल्याचे सांगत लोकांना पिस्टल दाखवत दहशत पसरवून पिस्टलमधून हवेत फायर केल्याप्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले (रा. खवणी) यांच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिस हवालदार गोपाळ बजरंग साखरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.