Solapur : परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

Solapur : परतीच्या पावसाने तालुक्यातील खरीप पिकाचे नुकसान

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा परतीच्या पावसाने तालुक्यातील बाजरी, तुर, मका,कांदा,सूर्यफूल,करडई या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतीसाठी घेतलेल्या कर्जाबरोबर सण कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला.

कालवा व नदीकाठचे क्षेत्र वगळता तालुक्यातील सर्व क्षेत्र हे जिरायत शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे अल्पशा पाण्यावर शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मका, सूर्यफूल,कांदा,करडई या पिकाची लागवड खरीप हंगामात केली. बहुतांश शेतकऱ्यांनी बाजरी तूर मका या पिकाचा विमा भरला. तर सूर्यफुलाला पिकविम्याचे कवच नसल्यामुळे सूर्यफुलाची भरपाई कोण देणार ? असा प्रश्न असून आहे.विमा कंपनीने पीक नुकसानीची कल्पना 72 तासाच्या आत दिली

तर शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरवला जातो मात्र बहुसंख्य शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईलचा अभाव असल्यामुळे तक्रार करण्याबाबत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे शिवाय गतवर्षी खरीपातील भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यामधील अजून काही शेतकऱ्यांची भरपाई कंपनीने दिली तर ॲप मध्ये बिघाड झाल्याने काही शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे लेखी तक्रार दिल्या होत्या त्याही शेतकऱ्याला विमा कंपनी दिला नसल्यामुळे विमा कंपनीच्या भरपाई बाबत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये शाशंकता आहे. सध्या तालुक्यातील आठ महसूल मंडल मधील बहुसंख्य मंडळमध्ये पडलेल्या पावसाबाबत

महसूल खात्याकडे झालेली नोंद व स्कायमेट कडील नोंद यामध्ये तफावत असल्यामुळे या तपावतीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.याकडे सोयीस्करच्या दुर्लक्ष झाले.सध्या राज्यातील राजकीय नेते एकमेकांच्या कुरघोड्या व आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी नेमकी दाद कोणाला मागायची अशा संभ्रमात आहे तालुक्यामध्ये आतापर्यंत मंगळवेढा मंडळ मध्ये देखील सर्वाधिक पाऊस व सर्वाधिक नुकसान झाले मात्र शासन एकाच मंडलला दिवाळीपूर्वी 25 % आग्रीम भरपाई देण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ज्यादा पाऊस झालेल्या व कमी पावसामुळे पिकाचे नुकसान झालेल्या इतर महसूल मंडल मधील शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवड्यावर पडलेल्या पावसामुळे अडीच एकर सूर्यफूल पिकाचे पीक पाण्याखाली गेली आहे परंतु या पिकाला विमा संरक्षण नसल्यामुळे पिकासाठी केलेला खर्च या पावसाने पाण्यात वाया घालवला शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात विचार करावा.

प्रमोद लेंडवे फटेवाडी.

शासनाने स्कायमेट चा अहवालानुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यापेक्षा महसूल खात्याकडील पावसाच्या नोंदीवर भरपाई द्यावी एकाच महसूल मंडळाला भरपाई न देता तालुक्यातील सर्वच महसूल महसूल मंडलमधील शेतकऱ्यांचे पावसाने तर काहींचे कमी पावसाने पीक जळून नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई द्यावी.

सिद्धेश्वर आवताडे, अध्यक्ष खरेदी विक्री संघ