सोलापूर : दामाजीसाठी आ.आवताडे समोर तगडे आव्हान कोण देणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damaji Sahakari Sugar Factory

सोलापूर : दामाजीसाठी आ.आवताडे समोर तगडे आव्हान कोण देणार ?

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची 28 हजार 157 सभासदाची प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यामुळे राजकीय हालचाली सुरू झाल्या असल्या तरी आ. समाधान आवताडे यांच्यासमोर कोण तगडे आव्हान देणार ? याची चर्चा उत्सुकता मात्र लागून राहिली.

गतवर्षीच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना मा.आ. प्रशांत परिचारक यांच्या समर्थकाला उमेदवारी देताना काही निष्ठावंतांना वगळले अशातच स्व. आ. भालके यांच्या तोंडून हुलजंती येथे प्रचारसभेत गेलेले शब्दाची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. भूमिपुत्रांचा मुद्दा अधिक प्रभावीपणे चर्चेला गेल्याने भालके गटाचा निसटता पराभव झाला परंतु आ. समाधान आवताडे सत्ता प्राप्तीनंतर त्यांनी सभासदांना जो जाहीरनामा दिला.

त्यामध्ये पाच वर्ष कारखाना एकसूत्री पनाने चालवून दाखवला सभासदांना दहा रुपये किलो दराने पाच वर्षे साखर दिली परंतु जाहीरनाम्यातील को-जनरेशन, इथेनॉलचा प्रकल्प होऊ शकला नाही शिवाय कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याचे कारण सांगत दामोदर देशमुख व त्यांच्या समर्थकांनी गेल्या काही महिन्यापासून आ. आवताडे वर आरोप सुरू केले मात्र ते आ.अवताडेला तगडे आव्हान देऊ शकत नाहीत तालुक्यांमध्ये स्व. भालके गटाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परंतु याच कालावधीत विठ्ठल कारखान्याची निवडणूक असल्यामुळे एकाच वेळी दोन लढाया भगीरथ भालके कसे लढणार हा देखील प्रश्न यानिमित्ताने उभा राहतोय.भालके गटाला स्व आ. भारत भालके हर्षराज बिले,धनंजय पाटील, बाबासाहेब बेलदार,ज्ञानेश्वर खांडेकर,यांची पोकळी जाणवणार आहे.

त्यामुळे या निवडणुकीत भालके गटाचे नेतृत्व मंगळवेढ्यातील कोण करणार हा देखील महत्त्वाचा आहे.मागील निवडणुकीत आ.अवताडे यांच्या बरोबर असलेले सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे हे यांनी त्यांच्यापासून फारकत घेतल्यामुळे हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे याशिवाय त्यांच्या धनश्री परिवारांचे शिवाजीराव काळुंगे यांना मानणारा वर्ग तालुक्यात आहे त्यांच्याकडे असणारी बँक व कारखाना चालवण्याचा अनुभव यामुळे ते कारखाना चालू शकतात मात्र सिताराम कारखाना चालू केल्यामुळे आखाड्यात काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे माजी अध्यक्ष अॅड नंदकुमार पवार हे आ. अवताडे बरोबर होते ते देखील त्यांच्यापासून अंतरावर आहेत.

रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांची देखील भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गत निवडणुकीत अवताडे बरोबर होते शाहू परिवाराच्या दोघांना त्यांनी संचालक केले होते मात्र जि.प.तील पत्नीच्या पराभवावरून कन्या कोमल ढोबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात खडे बोल सुनावले होते त्यामुळे या निवडणुकीत शाहू परिवाराची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे महाविकास आघाडी एकसंघ असताना राष्ट्रवादीचा उमेदवाराचा केलेला पराभव यामुळे आ. समाधान आवताडे गटांचा आत्मविश्‍वास वाढला.

नव्याने केलेले सभासद व अक्रियाशील सभासदांना देखील कायम ठेवून विरोधकाच्या आरोपातील पहिला मुद्दा खोडून काढला शिवाय आमदारकी असल्यामुळे कारखान्याची निवडणूक सहज शक्य होईल.असा होरा त्यांच्या समर्थकांना असल्यामुळे ते या निवडणुकीला सहजपणे हाताळू शकतात मात्र त्यांच्यासमोर विरोधक एकसंधपणे लढतात स्वतंत्रपणे लढतात हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे कारखाना चालवण्याची क्षमता,सभासदाच्या ओळखीचे नवे चेहरे व आर्थिक रसद यावर कारखान्याची निवडणूक ठरवली जाणार आहे कारखान्याच्या हिताचा विचार करणारे ऊस उत्पादक सभासद मोजकेच आहेत बिगर ऊस उत्पादक सभासद जास्त आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणारी.

Web Title: Solapur Damaji Sahakari Sugar Factory Election Mla Avatade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top