Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा धक्का: ४ माजी अध्यक्षांसह १० दिग्गज नेत्यांचे अर्ज बाद

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार माजी अध्यक्षांसह माजी मंत्री आणि दोन माजी आमदारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण ३१ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलले असून अध्यक्षपदासाठी सचिन कल्याणशेट्टी आणि राजेंद्र राऊत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे
Former political leaders face disqualification in the Solapur District Cooperative Bank election.

Former political leaders face disqualification in the Solapur District Cooperative Bank election.

esakal

Updated on: 

सोलापूर : सहकार कायद्याच्या कलम ११० (अ) आणि ८८ अंतर्गत झालेल्या कारवाईनुसार जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी चार माजी अध्यक्ष, एक माजी मंत्री आणि दोन माजी आमदार अपात्र ठरले आहेत. यात माजी आमदार राजन पाटील, संजयमामा शिंदे, दिलीप माने, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील या माजी अध्यक्षांसह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रशांत परिचारक व जयवंतराव जगताप यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाची संधी आमदार सचिन कल्याणशेट्टी किंवा राजेंद्र राऊत यांच्यापैकी एकाला मिळेल, अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...